Breaking news

देगलूर तालुक्यातील शेवाळा येथे डॉ.हनुमंत भोपाळे यांचे व्याख्यान

नांदेड(प्रतिनिधी)स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या बहि:शाल व्याख्यानमालेअंतर्गत भगीरथी प्रतिष्ठानच्यावतीने विद्या विद्याविकास विद्यालय, शेवाळा ता. देगलूर येथे व्यक्तिमत्त्व विकासतज्ज्ञ डॉ. हनुमंत भोपाळे यांचे यशाचा राजमार्ग या विषयावर आज बुधवार दि. 18 जानेवारी 2017 रोजी दुपारी 12.00 वाजता व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देगलूर पंचायत समितीचे माजी सभापती ईरवंतराव पाटील नरंगलकर हे राहणार आहेत. या व्याख्यानास मौजे शेवाळा ग्रामपंचायतचे सरपंच हाणमंतराव भोकसे, उपसरपंच प्रकाश पाटील, महेबुबसाब इमानदार, शिवकुमार पाटील, संस्थेचे कार्याध्यक्ष मधुकर पाटील नरंगलकर, विद्याविकास विद्यालयाचे मुख्याध्यापक एम.आर. कंबलेकर, नीती निकेतन विद्यालय आलूरचे मुध्याध्यापक लक्ष्मणराव मुंगडे, बाबू पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तसेच परिसरातील शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत ही व्याख्यानमाला संपन्न होणार आहे. या व्याख्यानाचा लाभ घेण्याचे आवाहन भगीरथी प्रतिष्ठानचे सचिव दिलीप बिरादार यांनी केले आहे.

Related Photos