लुईसब्रेल जयंतीनिमित्त अंध विद्यालयाय विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम

नांदेड (प्रतिनिधी) देगलूर येथील अंध विद्यालयात झालेल्या (लुईस ब्रेल ब्रेल लिपीचे जनक) यांच्या जयंती निमित्त सांस्कृतिक व क्रीडा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. गेल्या तीन दिवसांपासून अंध विद्यालययात जल्लोषाच्या वातावरणात ही स्पर्धा घेण्यात आली.

त्यात ४ जाने रोजी डाॅ.तममेवार. डाॅ.कद्रेकर, ५ जाने रोजी सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा कार्यक्रम व 6 जाने रोजी बक्षिस वितरण करण्यात आले.या वेळी शहराचे नगराध्यक्ष यांच्या पत्नी व सर्व नगरसेविका महीला मंडळ उपस्थित होते.यावेळी विद्यालयातील संगीत शिक्षक पंचशिल सोनकांबळे यांच्या दैनंदिन तालमीत तयार झालेले अंध विद्यार्थी आपल्या मंधूर व पहाडी आवाजाने रसिक श्रोत्यांची व मान्यवरांचेवर चांगलीच मोहिनी घातली.भावगीत,भक्तीगीत,देशभक्ती गीत,जनजागृती पर आणि लोकसंगीत विविध प्रकार,वैयक्तीक व सामूहिक रीत्या गाऊन रसिक श्रोत्यांची वाहवा मिळविली.

यावेळी शहराचे नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार यांच्या पत्नी सो.सुरेखा मोगलाजी शिरशेटवार, नगरसेविका.सो.कमलबाई धोडींबा वानखेडे,सो.जयश्री बाळू काबदे, सो.महानंदा नितेश पाटील, डाॅ.सो. कद्रेकर, सो.सुरेखा शिवाजी पाटील, संस्थेचे सचिव निलेश लोणीकर,सदस्य टी.आर.सावंत,पालक व सर्व विद्यार्थ्यां शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर.जी. माथुरे, तर आभार एम.बी.गायकवाड यांनी केले. विद्यालयाचे मुख्याध्यापक डी.आर.सावंत, दगडू करहाळे, एस.एम.शेळके, एम.व्ही.शिंदे, व्ही.एन. किर्तीवार, एम.वाय. भुताळे, संदीपभद्रे,राजु पाटील, आर.एन.स्वामी आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी कार्यक्रम घडवून आणला.

Related Photos