जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडनुकीवर माचनुर ग्रामस्थांचा बहीष्कार

बिलोली (शिवराज भायनुरे) बिलोली तालुक्यात होणार्या आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडनुकीत माचनुरच्या ग्रामस्थांनी मतदानावर बहीष्कार टाकण्याचा एकमुखी निर्णय घेतला आहे.

बिलोली तालुक्यातील माचनुर गाव हे सगरोळी जि.प गटा अंतर्गत आहे माचनुर ला जाण्यासाठी आजवर पक्का रस्ता नाही गावाला जाणार्या रस्त्यावर पुर्णत: खड्यांचे साम्राज्य असुन रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता हा प्रश्न माचनुर वाशीयासाठी गंभीर असताना याकडे लोकप्रतिनिधीनी सातत्याने जाणीवपुर्वक दुर्लक्ष केले आहे या सात कि.मी अंतराच्या रस्त्यावर एकुण तिन छोटेसे नाले आहेत तरी एकाही नाल्यावर पुल नसल्याने पावसाळ्यात या नाल्याच्या पाण्यामुळे माचनुर चा संपर्क तुटतो परिणामी दळण वळण पुर्णत: ठप्प होत असुन रुग्णांसह प्रसुतीसाठी जाणार्या महिलाना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे या गावचा आजवर पक्का रस्ता करण्यासाठी वालीच नाही की खरच प्रजासत्ताक भारताचे नागरीक आहेत का? असा प्रश्न निर्माण होत आहे जवळपास अडीच हजार लोकवस्तीचे असलेले माचनुर हे गाव महाराष्ट्र राज्याच्या शेवटच्या टोकावर आहे तर दुसर्या बाजूला तेलंगनातील सोई सुविधानी वसलेल्या गावाची परीस्थीती पाहता माचनुर गावाला तेलंगनामध्ये समाविष्ट करण्याची मागणी जोर धरीत आहे.

निवडणुका आल्या की माचनुरसाठी सोईसुविधाच्या आश्वासनाचे पाऊस पाडनारे लोकप्रतिनिधी मात्र निवडणुकीनंतर गायब होत असतात. माचनुर-कोटग्याळ वरुन कुडलवाडीला जाण्यासाठीचा पुलासहीत रस्ता नागणी-माचनुर-गंजगावहुन येसगी हायवेला जाणारा रस्ता माचनुर-कोटग्याळहुन कार्ला जाण्यासाठी रस्ता आजवर प्रलंबीत असुन माचनुरला मुलभुत सुविधा पुरविण्साठी लोकप्रतिनिधींसह प्रशासन अपयशी ठरल्याने प्रशासनाचा निषेध करीत येणार्या पं.समिती व जि.परीषद निवडणुकीच्या मतदानावर बहीष्कार टाकत असल्याचे निवेदन राजेश मनुरे, जगदीश फडसे, माधव पाटील, शंकर बोनगीरे, मधुकर कोपरे, विरभद्र स्वामी, नागेश कोमरे, दिगाबर पालंचवार याच्यासह हजार ग्रामस्थांच्या स्वाक्षरीचे निवेदन बिलोलीचे तहसीलदार गाडे यांना दिले आहे

Related Photos