Breaking news

माणिकनगरात दोन लाखांपेक्षा जास्तीची चोरी; देगलूरात एक चोरी, एक प्रयत्न

नांदेड(खास प्रतिनिधी)नांदेड शहरात झालेल्या चोरीत जवळपास दोन लाखांपेक्षा जास्तचा ऐवज चोरट्यांनी लांबविला आहे.देगलूर शहरात दोन आणि नांदेड शहरात एक अशा तीन चोरीच्या घटना समोर आल्या आहेत. देगलूरमधील एका चोरीच्या घटनेत 61 हजार, दुसरा चोरीचा प्रयत्न झाला आहे.

माणिकनगर नांदेड भागात राहणारे प्राचार्य बजरंग मुलचंद धुत हे जनाबाई कॉलेज गंगाखेड येथे नोकरीला आहेत. 16 फेब्रुवारी 2017 रोजी ते आणि त्यांचे सर्व कुटुंबिय आपल्या बहिणीच्या मुलीच्या लग्नासाठी लातूरला गेले होते. आज दि.18 फेब्रुवारी रोजी त्यांच्या घराचे कुलूप तुटलेले पाहून लोकांनी याबाबतची सूचना त्यांनी दिली. पोलीस निरीक्षक सुनिल निकाळजे, पोलीस उपनिरीक्षक पवार आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी या जागेची पाहणी केली. या घरातून जवळपास चार ते पाच तोळे सोने, अंदाजे वीस तोळे चांदीचे दागिणे, एक एलईडी व एक संगणक असा एकूण जवळपास दोन लाख रुपयांपेक्षा जास्तचा ऐवज चोरट्यांनी लांबविला आहे. बातमी लिहिपर्यंत प्राचार्य धुत नांदेडला आले आहेत आणि ते आपल्या घराची संपूर्ण तपासणी करुन तक्रार देणार आहेत. याबाबतचा अधिक तपास पोलीस हवालदार शिवाजी फोले करीत आहेत.

देगलूर शहरात पाटबंधारे व्यवस्थापन शाखा कार्यालयात कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी 16 फेब्रुवारीच्या रात्री प्रवेश करुन बिनतारी संदेश यंत्रणा आणि इतर साहित्य असा एकूण 61 हजार दोनशे रुपयांचा ऐवज चोरुन नेला आहे. शाखा अधिकारी सुधाकर कोंगे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार देगलूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस उपनिरीक्षक वाघमारे करीत आहेत. देगलूर शहरात 17 फेब्रुवारीच्या रात्री दोन चोरट्यांनी मारोती इरन्ना कडलवार यांच्या दुकानाचे शटर तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार देगलूर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. त्याबाबतचा अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना आहेत.

Related Photos