Breaking news

गरोदर महिलेची कुटूंबाने विशेष काळजी घ्यावी - डॉ. आकाश देशमुख

नांदेड(प्रतिनिधी)घरातील गरोदर महिलेची कुटूंबाने विशेष काळजी घेऊन एका सुदृढ बालकास जन्मल देण्या साठी प्रयत्न करावेत असे आवाहन देगलूर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आकाश देशमुख यांनी केले. ते केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या क्षेत्रीय प्रचार संचालनालयातर्फे शहापुर येथे आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय आरोग्य जनजागृती शिबीरात बोलत होते.

शहापुरच्य प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रांगणात आयोजित करण्या त आलेल्या कार्यक्रमामध्ये संचालनालयाचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण, सहाय्यक अधिकारी सतीश घोडके, अंबादास यादव, गट विकास अधिकारी जी.के.मेथेवाड, डॉ. अश्विनी देशपांडे, डॉ. के.व्हीग.पालेकर, डॉ. एन.आर. भावथनकर,पंचायत समितीचे विस्तार अधिकारी श्री तोपवाले, सरपंच गंगारेड्डी कोटगिरे,विवधि कार्यकारी सोसायटीचे चेअरमन हन्मूल सुरकुंटे, मुख्याध्यापक बरकतुल्ला, पर्यवेक्षिका के.टी. डुकरे, ग्रामपंचायत सदस्य तसेच महिला बचत गटाच्या सदस्य, अंगणवाडी सेविका, मदतनिस उपस्थि‍त होते. कार्यक्रमापूर्वी जि.प. प्रशालेपासून विदयार्थ्यांची जनजागृती रॅलीचे आयोजन गट विकास अधिकारी मेथेवाड यांचे हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरवातीस क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताेविक केले. स्त्रीारोग तज्ञ डॉ. अश्विनी देशपांडे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात म्हंटले की कमी वयात लग्न केल्यामुळे माता मृत्यूव प्रमाण व बालमृत्यू प्रमाण वाढते आहे. गरोदर महिलेची प्रसुती सरकारी दवाखान्यात करण्यासाठी कुटूंबामध्ये संवाद झाले पाहिजेत. महिलेने पोषण आहाराचे सेवन करावे, दोन धनूर्वाताचे इंजेक्शन्स, किमान चार तपासण्या व एक सोनोग्राफी करणे आवश्य क आहे असे ही त्यांनी सांगीतले. यावेळी अंणवाडी पर्यवेक्षिका के.टी. डुकरे, ज्योती नाईक यांनी ही मार्गदर्शनपर भाषणे केली. यावेळी घेण्यात आलेल्या पाककृती, रांगोळी, चित्रकला व निबंध स्पनर्धेच्या विजेत्यांना पारितोषिके देऊन पाककृती स्पर्धा – सुलोचना यनकुरे, भारतबाई कांबळे, ताई देशमुख, आशा नंदनवार, मंगल अन्न्मवार रांगोळी स्प्र्धा- गौरी नंदलवार, नेहा चिंतलवार, शुभांगी रामपुरकर, नेहा खाजामियॉं शेख, अंकिता वारणे चित्रकला स्पमर्धा- प्रियंका जोरगुलवार, शकुंतला पाटील, निकिता भुपतवार, स्वा२ती इल्टे पवार, वैष्ण वी चमावार, निबंध स्पनर्धा- संजना पाटील, संध्याारानी काशेट्टी, मनिषा टेकमाळे, श्रुतिका नंदलवार, प्रणाली सुरुवार यांना गौरविण्यात आले. या शिबीराचा लाभ घेण्यासाठी शहापुर गावातील महिला, गर्भवती महिला, किशोरवयीन मुलेमुली बहुसंखेने उपस्थित होते.

Related Photos