गुरु रविदास विज्ञानवादी होते म्हणून आंबेडकरांनी ग्रंथ अर्पण केला - देगलूरकर

नांदेड(प्रतिनिधी)गुरु रविदास हे चमत्कार करणारे महाराज नाही तर विज्ञानवादी महामानव होते म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपला ग्रंथ गुरु रविदासांना अर्पण केला असे विचार अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी मांडले.

गुरु रविदास सार्वजनिक जयंती महोत्सव मुकुंद नगर देगलूर जि. नांदेड येथील गुरु रविदास मंदिराच्या मैदानात आयोजित गुरु रविदास जयंती कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून चंद्रप्रकाश देगलूरकर बोलत होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दिगंबर शेळके हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

आपल्या भाषणात चंद्रप्रकाश देगलूरकर पुढे म्हणाले कि, गुरु रविदास हे विद्वानांचे विद्वान होते म्हणून अति विद्वान असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांची योग्य ती दखल घेतली. त्यांचा अभ्यास केला व आपला एक ग्रंथ त्यांना अर्पण केला. गुरु रविदास हे जर चमत्कार करणारे, देव व दैववादी महाराज असते तर डॉ. आंबेडकरांनी अभ्यासपूर्वक लिहिलेला आपला ग्रंथ गुरु रविदासांना कधीही अर्पण केला नसता. गुरु रविदास हे चौदाव्या शतकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. गुरु रविदास यांचा हा वैचारिक वारसा समजून घेऊन चर्मकार समाजाने गुरु रविदासांना रूढी, परंपरा, पोथी, पुराणात अडकऊ नये. त्यांना मंदिरात बंदिस्त करून टाळ कुटत बसू नये असे आवाहन करून चंद्रप्रकाश देगलूरकर शेवटी म्हणाले कि, गुरु रविदासांच्या विचारधारेतून स्वाभिमान निर्माण झाला पाहिजे. त्याशिवाय गुलामीवर मात करता येत नाही. आपसातील हेवे दावे सोडून आपण संघटित झाल्याशिवाय आपल्यावरील अन्याय-अत्त्याचार थांबणार नाहित.

याप्रसंगी साहित्यिक वीरभद्र मीरेवाड, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष माधव गायकवाड, पंडित पाटील, मारोती सुभेदार यांनीही आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व्यंकट कांबळे यांनी केले. मंचावर अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे युवा विभागीय प्रवक्ता चंद्रसेन गंगासागरे, युवा जिल्हाध्यक्ष शिवराज कांबळे, उपाध्यक्ष साईनाथ उतकर, नगरसेविका सौ. मीना व्यंकट कांबळे, बहुजन समता परिषदेचे सचिव संतोष औंढेकर, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे माधव निंबाळकर, सुरेश शेळके, सामाजिक कार्यकर्ते जळबा गंगासागरे, नागेश भालके, अजय हवेलीकर, रोहिदास बरबडेकर, माधव उतकर, राजेंद्र कांबळे, अनिल गंगासागरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बाबू मिनकीकर, बालाजी कांबळे, भानुदास कांबळे, संजय हवेलीकर, नागनाथ कांबळे, सुमित कांबळे, गजानन मिनकीकर, बालाजी सांगवीकर, गंगाधर हणमंतकर, गंगेश कौळासकर, संतोष कांबळे, कैलाश हणमंतकर, दत्तात्रय शेळके, राजू कांबळे, व्यंकटेश मिनकीकर, रोहिदास कांबळे, अशोक मिनकीकर, दिवाकर भाडेकर, अशोक निंबाळकर, सुरेश मिनकीकर, सत्त्यनारायण शेळके, शिवा वलांडीकर, अजय शेळके आदींनी परिश्रम घेतले. रविदासीया धर्म संघटनेचे तालुकाध्यक्ष परशुराम उतकर यांनी शेवटी आभार मानले. स्नेहभोजनाने कार्यक्रमाचा समारोप झाला. सर्वप्रथम देगलूर शहरातून गुरु रविदासांच्या प्रतिमेची वाजत - गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली.

Related Photos