logo

नांदेड/नायगाव, पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांच्या विशेष पथकाने दि.२१ रोजी कुंटूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत छापा टाकून १७ जुगार्यांसह १ लाख ७२ हजार ५६० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कार्यवाहीमुळे जुगार अड्डे चालविणाऱ्यात धास्ती निर्माण झाली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, गेल्या काही महिन्यापासून कुंटूर पोलीस स्थानकांच्या हद्दीत जुगार आद्द्यासह अवैद्य दारू आदी अनेक धंदे खुलेआम सुरु आहेत. या सर्व धंद्यांना लगाम लावण्याच्या सूचना पोलीस अधीक्षकांनी केल्या होत्या. मात्र काही पोलिसांच्या लाचखोरीच्या वृत्तीमुळे अवैद्य धंदे राजरोसपणे चालूच आहे. याबाबतची गुप्त माहिती पोलीस अधीक्षक मीना यांचे विशेष पथक प्रमुख ओमकान्त चिंचोलकर याना गुप्त खबऱ्यामार्फत मिळाली. त्यांचे पोलीस पथकातील लाठकर, खंदारे, नरने, जिंकलवाड, गंगुलवार, वानखेडे, जगताप, लाठकर, पायनापल्ले, कलकर्णी चालक देवकते याना घेऊन दि.२१ रोजी पेट्रोलिंग करताना कुंटूर पोलीस स्थानक हद्दीत असलेल्या मौजे राहेर गावातील पाण्याच्या टाकीजवळ मोकळ्या मैदानात आणि गावातील सुभाष नरवाडे यांच्या राहते घरासमोरील छपरीत चालू असलेल्या जुगाराजाच्या ठिकाणी छापा टाकला. या ठिकाणी जुगार खेळणारे व खेळविणारे असे १७ आरोपी तांब्या घेतले आहेत. यात शंकर संभाजी सरवदे, गंगाधर लक्ष्मण मुरके, शिवाजी रावसाहेब मुरके, परमेश्वर मानेजी बाधावाड, आद्रक मोहम्मद सरवर, बालाजी शेषेराव नरवाडे, सुभाष दिगंबर नरवाडे, कोंडीबा गंगाराम बाधावाड, सुधाकर शंकर हिवराळे, गंगाधर कोंडीबा यशवंतकर, संसंतोष गंगाधर कवटे, लक्ष्मण गंगाधर कवटे, पुंडलिक सुभाषराव पिलेलवाड, मैनोद्दीन शमशोद्दीन शेख, नागनाथ गंगाधर काटलेवाड, राम गंगाधर मुद्देवाड यांचा समावेश असून, यांच्यावर मुंबई जुगार कायदा कलाम १२ (अ) प्रमाणे कुंटूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

    Tags