logo

नांदेड, धर्माबाद पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्या मौजे पाटोदा येथील जुगार आड्यावर नांदेडचे पोलीस अधिकारी चंद्रकिशोर मिणा याच्या विशेष पथकानी भर पावसात छापा मारून उद्धवस्त केला आहे. पोलीस अधिक्षकांच्या विशेष पथकाची हि आणखी एक धाडसी कारवाई असून, यात २२ आरोपी अटक करण्यात आली आहेत. यामुळे जुगार अड्डा चालकात धास्ती निर्माण झाली आहे.

धर्माबाद तालुक्यातील मौजे पाटोदा गावाजवळील मौजे चिकन शिवारातील एका शेतातील शेडमध्ये लोकडोबा तुकाराम कुदळे व रामकिशन शंकर जगदंबेचे काही इसमांना घेऊन जुगार आड्यावर झन्ना -मन्ना नावाचा जुगारावर लाखो रुपये लावून खेळले व खेळविले जाते अशी गुप्त माहिती पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या विशेष पथकाला मिळाली होती. यावरून दि.२५ रोजी या ठिकाणी सुरु असलेल्या आड्यावर विशेष पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक ओमकान्त चिंचोळकर त्यांचे सहकारी पोलीस लाठकर, निरणे, जगताप, जिंकलवाड, कंधारे, गंगुलवार, लाठकर, कुलकर्णी, आवतीरक, पायनापल्ले, वानखेडे, आणि चालक देवकत्ते यांनी छापा मारला. यावेळी येथे २२ व्याकरी पत्त्यावर पैसे लावून झन्ना - मन्ना नावाचा खेळात असलयाचे दिसून आले. विशेष पथकाचा चहापापाडळलायचे समजताच अनेकानी चालू असलेल्या पावसाचा व अंधाराचा फायदा घेऊन पलायन करण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलीस पथकाच्या युअवकानी जुगारी लाकडोबा तुकाराम कुदळे वय २८, गंगाधर शंकर जगदंबे वय २५, रामकिशन शंकर जगदंबे वय ३० वर्ष दोघे रा.पाटोदा, मल्लेश राजांना कोंडवार वय २८ रा.कुंडलवाडी, प्रकाश आनंदराव हंबर्डे वय ४० रा.विजयगाव ता.उमरी, बाळजाई मरिबा भंडारे वय ३९ रा.खारेगाव, संदीप माधवराव गुडाळे वय २८ रा.धर्माबाद, पांडुरंग बाबुराव वाघमारे वय ३० वर्ष रा.धानोरा, साईनाथ भोजांना सरोडा वय २२ रा.आतकूर, आशिष मनोहर सूर्यवंशी वय २६ धर्माबाद, गोविंद लक्ष्मण मेळगावे वय ३२ रा.पाटोदा, विनायक अशोक साळुंके वय २६ रा.चिकना, रहीम खान शेख वय २३ रा.चिकना, अवधूत रावसाहेब आवर वय २५ रा.चिकना, मारोती गुणाजी कदम वय ३८ रा.येलापूर, शेख जमलोद्दीन शेख अमिलोद्दीन आय २४ रा.धर्माबाद, सय्यद गौस सय्यद बाबू वय २१ रा.धर्माबाद, केशव शयमरओ कदम वय २६ रा.चिकना, माधव गंगाधर आवारे वय ३५ रा.चिकना, लक्ष्मण मुतण्णा दारमोड वय २८ रा.आतकूर, गंगाधर मल्लेश शी वाट ३६ रा.सायखेडा, सुरेश शंकर निदानकर वय २८ रा.बन्नाळी ता.धर्माबाद याना अटक ताब्यात घेऊन त्यांच्याकडून नागडी ९७ हजार ५२० रुपये, जुंगरचे साहित्य पट्टे, २० मोबाईल, ०२ दुचाक्या, ०१ ऑटो, एकूण ४ लाख ३४ हजार ५२० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी वरील जुगाऱ्यांवर मुंबई जुगार कायद्याप्रमाणे धर्माबाद पोलीस स्थानकात कलम १२(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

    Tags