logo

नांदेड, धर्माबाद तालुक्यातील अतकूर-येताळा मधल्या  रस्त्यावर एका विवाहित महिलेचा दगडाने ठेचून खुन करण्यात आला. हि घटना दिनांक 26-5-17 रोजी राञी घडली असुन सकाळी घटनेची  माहिती मिळाली. शांताबाई अशोक मिसाळे  (मेसलू) वय 41( रा.रत्नाळी ,ता. धर्माबाद) या महिलेचा प्रथम  गळा आवळुन त्यानंतर  दगडाने ठेचून अज्ञात व्यक्तीने  खुन केला . दगडाने ठेचून  कपाळावरील कवटीच अलग केली.  त्याठिकाणी रक्ताने भरलेला दगड, पाणी पॉकीट व तेलंगणातील दारूच्या बाटलीचे झाकन आढळून आले. 

खुन कोणी  केला ?  का करण्यात आला? अद्याप कळाले नाही. यांचा तपास पोलिस घेत आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी प्रदीप पाटील, पोलिस निरीक्षक अंगद सुडगे  घटनास्थळी आले. श्वनपथक व  फिगंरप्रिन्टस विभागाना बोलविण्यात आले. श्वनपथकाचे  पोलिस उपनिरीक्षक मिलींद कुलकर्णी, पो.हे.कॉ.अयुब म.जाफर चालक अब्दुल गणी व ब्राऊनी नावाचा डॉग आणि फिगंरप्रिन्टस चे विशाल गोडबोले, के.बी.जोंधळे , भुरे  घटनास्थळी दाखल झाले.अज्ञात व्यक्तीवर कलम 302 भांदवीप्रमाणे धर्माबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरील प्रेत श्ववइच्छेदन करून नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले.

    Tags