logo

BREAKING NEWS

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहीर केली 828 पोलिस उपनिरीक्षकांची यादी

नांदेड जिल्ह्याचे 30 पोलिस झाले पोलिस उपनिरीक्षक
नांदेड, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने मागे घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक या परीक्षेत 3388 परीक्षार्थींनी परीक्षा दिली होती. त्यात 828 जणांची शिफारस महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने केली आहे. जाहिरातीतील सर्व जागा लोकसेवा आयोगाने या परीक्षा माध्यमातून भरल्या आहेत. या परीक्षेत नांदेडचे जवळपास 30 परीक्षार्थी पोलिस उपनिरीक्षक पदासाठी पात्र ठरले आहेत.

मागील वर्षी सन 2016 मध्ये  पोलिस उपनिरीक्षक मर्यादीत या परीक्षांची जाहिरात आल्यानंतर महाराष्ट्रातील पोलिस सेवेत असलेल्या अनेक जणांनी तयारी सुरू केली. त्यात लेखी परीक्षा झाल्यानंतर 3388 पोलिस शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरले. अनेकांनी सुट्टी घेऊन आपल्या या अभ्यासाची आणि शारीरिक चाचणीची तयारी केली होती. काहीजण गेली चार वर्षे या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी झटत होते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने काल दि. 5 मे रोजी अंतीम निवड यादी जाहीर केली आहे. त्यात 253 हे गुण पात्रतेत सर्वात कमी आहेत. खुल्या प्रवर्गात 642 जागांपैकी सर्वच्यासर्व उमेदवार पात्रतेत उतरले आहेत. अनुसूचित जातीमध्ये 154, अनुसूचित जमातीमध्ये 52, खुल्या प्रवर्गात 2 महिला, डी.टी.ए. 33 पुरूष 1 महिला, एन.टी.बी. 31 पुरूष, एस.बी.सी. 33 पुरूष 1 महिला, एन.टी.सी. 48 पुरूष, एन.टी.डी. 47 पुरूष, ओ.बी.सी. 147 पुरूष अशा 828 जणांची शिफारस करण्यात आली आहे. त्यात एकूण 163 महिला आहेत.

नांदेड पोलिस रेंजमध्ये एकूण 75 परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यातील नांदेड जिल्ह्याचे 30 विद्यार्थी आहेत. त्या 30 पोलिसांची नावे अशी - आनंद श्रीमंगले, किशोर गावंडे, आशिष बोराटे, टोपाजी कोरके, संदीप भोसले, राजेश घाडगे, अविनाश चव्हाण, पांडूरंग गायकवाड, बालाजी गोणारकर, अजय लोणीकर, बापू जोंधळे, जोंधळे, गौतम सोनकांबळे, मुरारी गायकवाड, रविंद्र तारू, जसपाससिंघ कोटतीर्थवाले, श्रीधर वाघमारे, नागनाथ तुकडे, अनिल सोनकांबळे, बालाजी लोसरवार, मारोती चव्हाण, पंढरी गायकवाड, बालाजी नागनवाड, ज्ञानेश्वर जुन्ने, सुनील गिरी, बालाजी जोनापल्ले, गजानन गाडेकर, जगन्नाथ मेनकुदळे, प्रकाश बलकेवाड. या पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या नांदेडच्या सर्व यशवंतांचे विशेष पोलिस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा, अप्पर पोलिस अधीक्षक मंगेश शिंदे, गृह पोलिस उपअधीक्षक विश्वेश्वर नांदेडकर, पोलिस निरीक्षक संदीप गुरमे, सुनील निकाळजे, साहेबराव नरवाडे, प्रशांत देशपांडे यांनी अभिनंदन केले आहे.

    Tags