logo

BREAKING NEWS

अल्पवयीन बालिकेवर अत्याचार; तीन महिलांचा हुंड्यासाठी छळ

एकीचा सासऱ्याने केला विनयभंग; एका बालकास पळवले

नांदेड, तीन महिलांना हुंड्यासाठी छळ आणि एका महिलेचा विनयभंग सोबतच एका अल्पवीयन बालिकेवर अत्त्याचार अशा पाच महिलांविरुध्दच्या गुन्ह्यांची पोलीस दप्तरी नोंद आहे. तसेच नांदेड शहरातून एका 16 वर्षीय बालकाला पळवून नेल्याची घटना घडली आहे.

लोहा येथे एका 16 वर्षीय बालिकेवर 2015 च्या गणेश विसर्जनदिवसापासून ते 10 एप्रिल 2017 दरम्यान अनेक वेळेस अत्त्याचार घटला. त्या 16 वर्षीय बालिकेने लोहा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार आरोपीविरुध्द पकोस्क कायद्यासह भारतीय दंडविधानाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरिक्षक काथवटे अधिक तपास करीत आहेत. लोहा जवळच एका गावात 19 एप्रिल 2017 रोजी मध्यरात्री एक महिला आपल्या घरात झोपली असतांना तिच्या सासऱ्याने तिचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. महिलेच्या तक्रारीवरुन लोहा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस हवालदार भारती करीत आहेत.

कंधार येथे 15 मे 2017 पासून ते आजपर्यंत दर्गा तांडा येथे राहणाऱ्या एका महिलेस तिचा सासरच्या मंडळीकडून नंनदेच्या लग्नासाठी माहेरहून 50 हजार रुपये घेऊन येण्यासाठी तिला शारीरिक, मानसिक त्रास दिला. या तक्रारीवरुन कंधार पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक गित्ते करीत आहेत. स्वप्नभूमिनगर कंधार येथील एका विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार तिच्या सासरच्या मंडळीने तिला दुसरे दुकान टाकण्यासाठी माहेरहून 10 लाख रुपये आणावेत असे सांगून तिचा भरपूर छळ केला. कंधार पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस नाईक लालवंडे अधिक तपास करीत आहेत. 

हिमायतनगर येथील विवाहिता सोनाबाई रामराव वाळके (वय-22) हिने 16 मे 2017 रोजी वाळकेवाडी गावराण शिवारात सासरच्या जाचाला कंटाळून कोणते तरी विष पिऊन आत्महत्त्या केली. अशी तक्रार नागोराव जयवंत बरडे यांनी दिल्यावरुन हिमायतनगर पोलीसांनी मयत महिलेच्या सासरच्या मंडळीविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस उपनिरिक्षक नितीन गायकवाड करीत आहेत.  नांदेडच्या आंबेडकरननगर मधून दि.7 मे 2017 रोजी दुपारी 1 वाजता अभय हा 16 वर्षीय मुलगा चप्पल खरेदी करण्याासाठी घराबाहेर गेला. त्यास कोणीतरी अज्ञात लोकांनी अज्ञात कारणासाठी पळवून नेल्याची तक्रार आई आनंदी गौतम भालेराव यांनी दिल्यावरुन शिवाजीनगर पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरिक्षक विठ्ठल पाटील अधिक तपास करीत आहेत. 

    Tags