logo

BREAKING NEWS

राजपत्रित अधिकारी महासंघाची सोमवारी बचत भवन येथे बैठक

नांदेड, महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाची बैठक सोमवार 22 मे 2017 रोजी सायंकाळी 4.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील बचत भवन येथे आयोजित करण्यात आली आहे.

या बैठकीस संघटनेचे स्थापक व मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे व महासंघाचे सरचिटणीस समीर भाटकर हे मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीत महासंघाच्या मुंबईतील बांद्रा येथे बांधण्यात येणाऱ्या कल्याण केंद्र इमारतीच्या संदर्भात माहिती देण्यात येणार आहे. तसेच राज्यातील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात चर्चाही करण्यात येणार आहे. म्हणून जिल्ह्यातील सर्व राजपत्रीत अधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा महासंघाचे जिल्हाध्यक्ष जयराज कारभारी यांनी केले आहे.

अर्धापूर येथे शेतकरी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन   
जल व भूमी व्यवस्थापन संस्था (वाल्मी) औरंगाबाद व नांदेड पाटबंधारे मंडळ नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने "पाण्याची उत्पादकता वाढवून पाण्याचा प्रभावी वापर" या विषयावर बुधवार 24 मे व गुरुवार 25 मे 2017 रोजी पाटबंधारे वसाहत अर्धापूर येथे शेतकरी प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती नांदेड उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग क्र. 1 चे उपकार्यकारी अभियंता यांनी दिली आहे.   

    Tags