logo

BREAKING NEWS

बसपा प्रदेश प्रभारी प्रा.डॉ. नातु कंधारे व अ‍ॅड. संदिप ताजने यांचा सत्कार

नांदेड, पिपल्स महाविद्यालय येथे दि. 18 मे रोजी बहुजन समाज पक्षाच्या वतीने विभागीय पदाधिकारी मेळावा घेण्यात आला. या वेळी बहन कु. मायावतीजी यांना लखनऊ येथे प्रा. डॉ. नातु कंधारे व अ‍ॅड. संदिप ताजने यांची महाराष्ट्र प्रदेश प्रभारी म्हणुन निवड केल्याबद्दल बसपाचे राष्ट्रीय सहसचिव खा. विरसिंघ व प्रदेशाध्यक्ष विलास गुरुड यांनी प्रदेश प्रभारी यांचा सत्कार केला व पदाधिकार्‍यांना मार्गदर्शन केले. 

यावेळी खा. विरसिंघ यांनी पक्ष बुथ पातळीवर समाजाच्या कामी कार्यकर्ता पडला पाहिजे व जनमाणसांच्या समस्यांकडे लक्ष देण्याचे आवाहन केले. येणारा काळ हा मागासवर्गीय समाजाच्या दृष्टीने अतिशय कठिण असुन जर सरकारचे धोरण पुढे असेच चालु राहिले तर मागासवर्गीयांसाठी प्रत्येक क्षेत्रात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात असे प्रदेशाध्यक्ष विलास गरुड यांनी सांगितले. यावेळी प्रदेशमहासचिव प्रा. व्यंकट कसबे, योगीराज आनंद, जिल्हाध्यक्ष मनिष कावळे, राहुल कोकरे, नामदेव ढवळे, दिगंबर ढोले, विक्की वाघमारे, दिपक सावंत, सुनिल सोनसळे, जावेद शेख, सखाराम इंगोले, प्रकाश तुळसे, बबन गटपाळे, विनोद वाघमारे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    Tags