BREAKING NEWS

logo

नांदेड, शेजार धर्माप्रमाणेच समानधर्म व गावधर्म महत्त्वाचा असून संघटनेतील कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यातील आपसातील संवाद कमी झाल्याने कामात विस्कळीतपणा येतो. चळवळीत पुन्हा जोम आणण्यासाठी तरूणांनी नव्याने संघटनेसाठी उभे राहण्याची आवश्यकता आहे. मराठा सेवा संघाचे व सर्व प्रणित संघटनांचे कार्य संपर्क, समन्वय, संवाद या त्रीसूत्रीनुसार चालते, असे प्रतिपादन मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष ऍड. पुरूषोत्तम खेडेकर यांनी तामसा ता. हदगाव येथे आयोजित जनसंवाद दौरा निमित्त कार्यक्रमात केले. अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष अर्जुन तनपूरे होते, तर प्रमुख पाहुणे विभागीय अध्यक्ष प्रा.गणेश शिंदे, जिल्हाध्यक्ष सोपानराव क्षीरसागर, शे.रा. पाटील, प्रा. संतोष देवराये, नानाराव कल्याणकर यांची उपस्थिती होती.

संयोजक पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील कृषी परीषदेचे प्रदेश उपाध्यक्ष भागवत देवसरकर यांनी प्रास्ताविक व मान्यवरांचे स्वागत केले. समविचारी संघटनांनी घेतलेल्या भूमिका मराठा सेवा संघाला मान्य राहतील, असे कोणी समजू नये. मराठा समाजातील अनेकांमध्ये क्षमता व गुणवत्ता असून याचा मराठा समाजाच्या हितासाठी उपयोग होणे आवश्यक आहे. आगामी काळात संघटनेसाठी आपण प्रत्येक तालुक्यात एक दिवस पूर्णवेळ देण्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी उपस्थित बांधवांना अर्जुन तनपुरे, प्रा.डॉ. गणेश शिंदे आदींनी मार्गदर्शन केले. कार्यकर्त्यांच्या भावना, मनोगत विस्तृतपणे खेडेकरांनी ऐकून समर्पक विवेचन केले व उपस्थित समाजबांधवांशी संवाद साधला. यावेळी डॉ. प्रल्हाद तवर, स.द. कल्याणे, डॉ उत्तम शिंदे, बाबुराव वानखेडे, बापुराव कौशल्ये, संजय कदम, डॉ. गजानन कनवाळे, डॉ तवर, डॉ.सचिन सूर्यवंशी, शरद दुगाळे, सचिन माने, संभाजी कौशल्ये, शंकर दुगाळे, देवानंद चव्हाण, दीपक पवार, शंकर जगदाळे, युधीष्टीर देवसरकर, शरद पवार, अनिल देवसरकर यांच्यासह परिसरातील मराठा समाज बांधव आणि बहुजन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भागवत देवसरकर तर आभार प्रदर्शन बापुराव कौशल्ये यांनी मानले.

    Tags