BREAKING NEWS

logo

नांदेड, हदगाव तालुक्यातील मौजे पळसा येथे आंतरराष्ट्रीय योगदिन घेण्यात आला. स्वातंत्र्यसैनिक बापुराव पाटील सार्वजनिक वाचनालय, पळसा येथे योग दिवस साजरा करण्यात आला. प्रारंभी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व अभिवादन करण्यात आले. यावेळी पं.स. हदगावच्या सभापती सौ. सुनिताबाई दवणे, डॉ. आर.जी. गंगासागर, तंटामुक्ती अध्यक्ष तुकाराम घंगाळे, सरपंच सौ. पार्वतीबाई भिसे, चेअरमन विलास मस्के, ग्रामसेवक बेंगाळ, पो.पा. सुभाष पवार, शंकर कदम, नेहरू युवा ता. प्रतिनिधी महेश राठोड, वाचनालयाचे संचालक कुबेर राठोड यांची उपस्थिती होती.

यावेळी डॉ. आर.जी. गंगासागर यांनी योगाविषयी मार्गदर्शन करून प्रात्यक्षिके करून दाखविली. रोजच्या दैनंदीन जीवनामध्ये योगाचे महत्त्व सांगितले व योगासनाची प्रात्यक्षिके करून दाखविण्यात आली. कोणत्याही व्याधी होणार नाहीत, रोज योगसन केल्यास दवाखान्यामध्ये जाणे बंद होईल. कोणतेही आजार होणार नाही. शारीरिक व्यायाम व पूरक व्यायाम करणे गरजेचे आहे, असे डॉ. गंगासागर यांनी सांगितले. यावेळी गावातील नागरिक वाचक, युवक, युवती, बिडवे मॅडम, कदम मॅडम, अबुलकर मॅडम, जि.प.कें.प्रा. शाळा पळसा, प्रेमराव मस्के, पंजाबराव मस्के, शेषराव मस्के, योगेश राठोड, देवराव कांबळे, सोपान हपगुंडे, हरिचंद्र आडे, प्रसाद आडे, बालाजी पवार, संतोष भिसे, सचिन गोडबोले, शंकर भिसे, प्रसन्न आडे इत्यादी उपस्थित होते.

    Tags