BREAKING NEWS

logo

नांदेड, एका जेसीबी विक्री प्रकरणात झालेल्या परस्पर वादातून फसवणूकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यास नांदेडच्या जिल्हा न्यायालयाने जामीन नाकारला. त्याप्रकरणी उच्च न्यायालय खंडपीठ संभाजीनगरचे न्यायमूर्ती के.एल.वडणे यांनी विक्रेत्याला अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

1 मे 2017 रोजी शिला तुकाराम जाधव नावाच्या महिलेने मनाठा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती की, बालाजी जानकीराम चाभरेकर यांच्यासोबत जेसीबी मशिन विकत घेण्याचा करार झाला होता. पैश्याच्या देवाण-घेवाणीतून पुढे बालाजी चाभरेकरने ते जेसीबी मशिन आपल्या ताब्यात घेतले आणि शिला जाधवच्या तक्रारीवरुन मनाठा पोलिसांनी  बालाजी चाभरेकर विरुध्द भादंविच्या कलम 420,404 आणि 406 नुसार गुन्हा दाखल केला. बालाजी चाभरेकरने नांदेडच्या जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळावा असा अर्ज केला होता, परंतु जिल्हा न्यायालयाने त्यास नकार दिला होता. यानंतर बालाजी चाभरेकरने उच्च न्यायालयात अपिल दाखल केले. यात बालाजी चाभरेकरच्या वतीने ऍड. गजानन कदम यांनी सदर प्रकरण हे दिवाणी स्वरुपाचे असून त्यास उगीचच फौजदारी स्वरुप देण्याचा प्रयत्न केला आहे. हा युक्तीवाद ग्राह्य मानून न्यायमूर्ती वडणे यांनी बालाजी चाभरेकरला अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

    Tags