BREAKING NEWS

logo

नांदेड, रेशीम संचालनालयाच्या वतीने आयोजित जिल्हा रेशीम कार्यालय पाचगणी रोड वाई जि. सातारा येथे सिल्क म्युझियम, माहितीगृहाचे उद्घाटन राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते रविवार 9 जुलै 2017 रोजी सकाळी 10 वा. संपन्न होणार आहे. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्सव्यवसाय व वस्त्रोद्योग राज्यमंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर राहणार आहेत.

प्रमुख पाहुणे म्हणुन जलसंपदा, जलसंधारण, संसदीय कार्य राज्यमंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय शिवतारे, सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजिवराजे नाईक निंबाळकर, खासदार उदयनराजे भोसले यांची उपस्थिती राहणार आहे. सर्वश्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, मकरंद पाटील, शिवेंद्रराजे भोसले, शशिकांत शिंदे, जयकुमार गोरे, शंभुराजे देसाई, बाळासाहेब पाटील, आनंदराव पाटील यांचीही उपस्थिती राहणार आहे, असे रेशीम विकास अधिकारी श्रेणी -2 नांदेड यांनी कळविले आहे. 

    Tags