logo

तामसा, सर्कलमधील जांभळा वनविभागांतर्गत येणाऱ्या नर्सरीतील मजुरांना मागील नऊ महिन्यापासून मानधन मिळाले नसल्याने संतप्त झालेल्या मजुरांना रोपे घेऊन जाणारी वाहने अडवून निषेध केला आहे.

हदगाव तालुक्यातील मौजे जांभळा गावातील नसर्सरीमध्ये रोजगार हमी योजनेतून रोपवाटिकेत महिला - पुरुष मजूर काम करतात. या मजुरांना गेल्या नऊ महिन्यापासून घामच दाम मिळाला नाही. आज उद्या करत संबंधित विभागाचे अधिकारी चालढकल करीत आहेत. यामुळे मजुरांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळा आली आहे. तसेच मुलं बाळांचे शिक्षण थांबण्याची भीती व्यक्त होत आहे. नऊ महिन्याच्या काळात जवळपास ३६ मजुरांनी प्रामाणिकपणे दिवसभर घाम गाळूनही मोबदला मिळत नसल्याने वरिष्ठांकडे तक्रारही केली. मात्र याचा कुठलाही परिणाम झाला नाही उलट वनविभागाचे कर्मचारी अरेरावी भाषा करत धमकी दाखवून काम करून घेत आहेत. त्यामुळॆ संतप्त झालेल्या मजुरांनी वृक्ष लागवडीसाठी वृक्ष नेणारे ट्रॅक्टर  अडवून आपला निषेध व्यक्त केला आहे.

एकीकडे शासन वृक्ष लागवडीसाठी कोट्यवधींच्या खर्चातून कसोशीने प्रयत्न करीत आहे, मात्र हदगाव तालुक्यातील जांभळा येथे वनविभागाचे अधिकारी - कर्मचारी या योजनेला हरताळ फासण्याचे काम करत असल्याचे यावरून दिसून येत आहे. या प्रकारची शासनाने गांभीर्यानने दाखल घेऊन हदगाव वनपरीक्षेत्रांतर्गत झालेल्या वृक्ष लागवड योजनेच्या कामाची चौकशी करून मजुरांना तातडीने मानधन द्यावे. अन्यथा येथील मजूर उपोषणाचे हत्यार उपसण्याचा तयारीत असल्याचे सांगण्यात आले आहे.

वरिष्ठांना विचारानं एली तर पेमेंट जमा झाल्याचे सांगितले जाते, मटार अजूनही आम्हाला एक रुपयाही मिळाला नाही. वनविभागाचे डाखोरे धमकीची भाषा करून काम करा अन्यथा हातकडी टाकून पोलिसात नेण्याची धमकी देत आहेत. असा आरोप तक्रारकर्त्या माया देवराव हटकर यांनी केला आहे.

    Tags