logo

नांदेड, जुलै महिन्याचे 10 दिवस उलटून गेले तरी अजूनही ओढे, नाले खळखळले नाहीत, नद्यांना पूर आला नाही. जुन महिन्याच्या सुरूवातीला पडलेल्या सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरणी आटोपून घेतली. मात्र जुन महिनाच्या मध्यतंरीपासून उघडीप दिल्याने जमिनीच्या वर निघालेली पिके पाण्याअभावी करपून जात आहेत. यामुळे शेतकरी सध्या चिंतेचे वातावरणात असला तरी दुबार पेरणीचे संकट ओढाउने म्हणून देवाच्या दारी प्रार्थना करीत आहेत.

जिल्ह्यात सरासरी 60 ते 70 टक्के पेरण्या झाल्या असून यामध्ये कंधार, लोहा, नायगाव या परिसरात मोठ्या प्रमाणात पेरण्या झाल्या तर देगलूर, बिलोली, किनवट, हदगाव या परिसरात शेतकऱ्यांनी पेरण्या करण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतिक्षा करत होते, यामुळे या परिसरात अधिकच्या पेरण्या झाल्या नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. जुन महिन्याच्या सुरूपासून पावसाने जिल्हाभर आपले बस्तान मांडले होते. मात्र जुलै महिना उजडला तरी मोठा पाऊस झाला नसल्याने शेतकरी सध्या चिंतातूर आहेत. जुन महिन्याच्या सुरूवातीला काही भागात जोरदार पेरण्या झाल्या आणि दररोज पडणाऱ्या हलक्या पावसाच्या सरीच्या जोरावर पिकांनीही चांगलाच जोर धरला होता.  पण गेल्या 15 ते 20 दिवसांपासून पावसाने चांगलीच धडी मारल्याने शेतकऱ्यांना मोटारीद्वारे पाणी देऊन पिकांना जीवदान द्यावे लागत आहे. कापूस, सोयाबीन, ज्वारी ही पिके दमदार निघाली असली तरी उन्हाच्या तिव्रतेने करपून जात आहेत. सकाळच्या वेळी पिके हिरवेगार दिसत असले तरी दुपारी मात्र पडलेल्या उन्हाने माना टाकून देत असून याचबरोबर गोयलगाय आणि इतर किटकनाशकांच्या प्रार्दुभावामुळे पिकांच्या पाण्याची चाचणी होत आहे. पाऊस जर लवकर पडला नाही तर दुबार पेरणीच्या संकटाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागणार काय ? असा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.

    Tags