BREAKING NEWS

logo

नांदेड, जुलै महीना आर्धा संपत आला असतांना वरुन राजाने पाठ फिरवील्याने बळीराजासह सर्वसामान्य जनता चिंतेत आहे. शेतकरी पावसासाठी देवी - देवतांना साकडे घालत असुन, चिमुकले बालके धोंडी..धोंडी..पाणी दे..चा नारा देउन वरुण राजाला विनवणी करीत असल्याचे चित्र नांदेड जिल्ह्यात दिसून येत आहे. 

पावसाच्या हुलकावनीने पहील्या टप्यात लावलेली कापसाची पिके नुकसानीत आली असुन, ती जगवीण्यासाठी शेतकर्‍यांना भांड्याने पाणी देण्याची वेळ आली आहे. तरीसुध्दा पिके वाळु लागली असुन, येत्या 2 दिवसात पाऊस न झाल्यास शेतकर्‍यांवर दुबार, तिबार पेरणीचे संकट येण्याच्या भिती व्यक्त होत आहे. मृग नक्षत्राच्या पहील्याच पावसावर तालुक्यातील नदीकाठ परीसरातील जवळपास सर्वच शेतक-यांनी खरीप हंगामातील पेरण्या केल्या. परंतु मागील दिड महिन्यापासुन वरुन राजाने पाठ फिरवील्यामुळे पावसाअभावी पिके वाया जाण्याच्या भीतीने बळीराजा चिंतातुर झाला आहे. रोहीण्या, मृग, आर्द्रा नक्षत्रातही समधानकारक पाऊस पडलाच नाही. आभाळात आलेली ढग वादळी वा-याने पुढे पळत आहेत. प्रत्यक्षात पाऊस पडत नसल्याने शेतक-यांसह सर्वसमान्य नागरीक वाढत्या उकाडयाने हैरान झाले आहेत. त्यातच जनवरांच्या चा-याचाही प्रश्‍न गंभीर बनला असुन, वेधशाळेच्या अंदाजाने कोरडवाहु शेतक-यांनी पेरलेली बियाणे जमीनीतच गुदमरुन जात आहेत. तर काही शेतक-यांच्या जमीनीतील ओलाव्याने पिके वार्‍यावर डोलु लागली, तर काहींची बियाणे बाळसे धरण्यापुर्वीच कोमेजुन गेली आहेत. जी बिजांकुरे वर आली ती ही वाढत्या तापमानामुळे सुकन जात असल्याचे चित्र परीसरात दिसत आहे.

चातकाप्रमाणे पावसाची प्रतीक्षा करणारे शेतकरी पिकांना जगवीण्यासाठी भांड्याने पाणी देत आहेत. गतवर्षी नुकसानीत आलेल्या शेतक-यांना शासनाकडुन मदत मिळाली मात्र, ती अत्यल्प असल्याने गरीब शेतकरी आर्थीक संकटात आला आहे. यावर्षीच्या शासनाने कर्जमाफी जाहीर केली मात्र त्याची अंमलबजावणी झाली नसल्याने पेरणीसाठी अनेक शेतकर्यांना साहुकार व बैंकेच उंबरठे झिजवावे लागल आहे. तीवेळ पुढील वर्षात येऊ नये म्हणुन पाण्यासाठी शेतकरी देवी - देवतांना साकडे घालत असुन, ग्रामीण भागात अन्नदानाच्या पंगती, महिलांकडून घट मांडण्यावर भर दिला जात आहे. तसेच शहरातील बालके वरुन राजाला खुश करण्यासाठी लिंबाच्या फरोळ्यावर बेंडुक बांधुन धोंडी...धोंडी पाणी दे.. साई माई पिकु दे..धोंडी बाई धोंडी ..धोंडीचे दिवसं..पाणी मोठ हिवस...असा नारा देत येरे..येरे... पावसा तुला देतो पैसा.. अशी विनवणी वरुन राजाकडे करीत धान्य गोळाकरुन सायंकाळी जेवनाच्या पंगती उठवत असल्याचे नांदेड जिल्ह्यासह हिमायतनगर, भोकर, देगलूर, नायगाव, मुखेड, हदगाव, कंधार अर्धापूर, उमरी आदींसह अन्य तालुक्यातील ग्रामीण भागात दिसून येत आहे. 

    Tags