BREAKING NEWS

logo

नांदेड, मनाठा पोलीस स्टेशन हद्दीत विशेष पथकाची एकाच दिवसात दुसऱ्यांदा टाकलेल्या धाडीत ५ लाख ५१ हजार ५८० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या घटनेवरून मनाठा ठाण्याचे सपोनि यांची अकार्यक्षमता व हप्तेखोरी कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. 

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांच्या पथकाने दोन दिवसापुर्वीच मसाई धाब्यावरुन खुले आम खेडो पाडी होणारी दारू विक्री करणारी टोळी मुद्देमालासह पकडली होती. त्या लोकांना विशेष पथकानी मनाठा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करून स्थानिक पोलिसांच्या  कार्यक्षेत्रात होणारी हप्तेखोरी उघड केली होती. या घाटानेवरुन धडा घ्यायचे सोडून येथील अधिकारी मात्र अवैध धंदे चालकांना अभय देण्याचे धोरण अवलंबुन आपली मनमानी करीत आहेत. असे असतानाच काल पुन्हा विशेष पथक प्रमुख ओमकांत चिंचोलकर यांनी नांदेड येथून मनाठा येथे विक्री साठी जाणारी दारू व एक जिप पाठलाग करून अर्धापुर मध्ये पकडुन कार्यवाही करून पुन्हा एकदा मनाठा विभागात खुले आम दारूची विक्री होत असल्याचे दाखवुन देत येथील अधिका-यांना जबरदस्त चपराक दिली होती. दरम्यान कालच्या घटनेची बातमी पसरत असतानाच पुन्हा पोलीस अधिक्षक चंद्रकिशोर मिना यांना एक खबर मिळाली की मनाठा हद्दीतील बरडशेवाळा येथे एक वाहनात अवैध रितीने दारू विक्रीस जाणार आहे. त्यांनी तातडींने रात्री १२ वाजता विशेष पथक प्रमुख ओमकांत चिंचोलकर यांना तात्काळ कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पथकाने रात्रीचे १ वाजता बरडशेवाळा येथे सापळा लावुन इंडीका वाहन क्रमांक एम एच ०४ डि इ २३१४  यांची तपासणी केली. दरम्यान त्यामध्ये रॉयल स्टॅग कंपनीची ५० हजार ४०० ची, तर इम्पीरीयल ब्ल्यु कंपनीची ५३ हजार ७६० ची दारू व मॅकडॉल कंपनीची ४६ हजार २५० ची दारू आणि २ आरोपीकडुन नगदी ११७० रुपयाची रोकड तसेच एक टाटा इंडीकाकार जुनी गाडीची किमत ४ लाख असा एकुन ५ लाख ५१ हजार ५८० रूपयाच्या मुद्देमाल दारूची चोरून विक्रीसाठी वाहतुक करताना पकडले. यात नामे सतपालसिंग जगतसिंग त्रिकुटवाले व सुरजीत सिंग लहरसिंग मिलवाले यांना अटक करून दुसऱ्या आरोपी ज्यांना ही दारू विक्रीसाठी जाणार होती. ते आरोपी राम पोकलवार यांच्या विरोधात मनाठा पोलीस स्टेशनमध्ये विशेष पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या फिर्यादीवरून गुरन ६८/१८ कलम ६५ [ ई] नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे अवैद्य दारू विक्री कारनारायचे धाबे दणाणले आहेत.

    Tags