BREAKING NEWS

logo

नांदेड (एनएनएल) एक महिन्यापूर्वी कहाळा ते बरबडा या मुख्य रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाचया वतीने करण्यात आले होते, परंतु हे काम निकृष्ठ दर्जाचे असल्याने या कामात भ्रष्टाचार झाला असून हा रस्ता पावसाळ्याच्या पहिल्याच पावसाने उखडला, त्यामुळे संबंधित गुत्तेदारावर कारवाई करण्याची मागणी भाजपा युवा मोर्चाचे सरचिटणीस आशितोष धर्माधिकारी यांनी केली.

कहाळा ते बरबडा हे अंतर 8 कि.मी.चे आहे. या मुख्य रस्त्यावर पाटोद्यापासून बरबडा येथे शाळकरी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात ये-जा करतात, त्याचबरोबर या रस्त्यावरून नांदेडकडे जाण्यासाठी व रूग्णांना तातडीची सेवा मिळण्यासाठी काही गंभीर आजारातील रूग्ण जात असतात, या रस्त्यावरील खड्ड्यामुळे वाटेत अनेक अपघात घडले आहेत. अतितातडीच्या सेवेसाठी शहराकडे जाणारा हा रस्ता सुरक्षित असला पाहिजे. गेल्या महिन्यात या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते, परंतु गुत्तेदाराने निकृष्ट दर्जाचे काम केल्याने हा रस्ता पूर्णपणे जागोजागी उखडला आहे. जि.प. सर्कल, पंचायत समिती गण आणि काही ग्रामपंचायतीअंतर्गत या रस्त्याच्या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा केला होता. असे असतानाही या रस्त्याच्या कामाविषयी नागरिकांच्या मनात असंतोष निर्माण झाला आहे. हा रस्ता पूर्ववत डांबरीकरण करावा अन्यथा भाजपा युवा मोर्चाच्या वतीने तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस आशितोष धर्माधिकारी बरबडेकर यांनी दिला आहे.

    Tags