logo

BREAKING NEWS

जि.प. कर्मचाऱ्यांचे बदल्यांच्या समुपदेशनाचे वेळापत्रक जाहीर

नांदेड,  जिल्हा परिषदेच्या गट क व गट ड कर्मचाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदलीबाबत शासनाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार  सार्वत्रिक बदल्या 2017 साठी जिल्हा स्तरावरील बदल्यांचे समुपदेशनाचे वेळापत्रक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष यांनी निश्चित केले आहे. त्यानुसार वेळापत्रकाची नांदेड जिल्हा परिषदेअंतर्गत गट क व ड मधील कर्मचाऱ्यांनी नोंद घ्यावी, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नांदेड यांनी कळविले आहे. 

जिल्हा परिषद सार्वत्रिक बदल्या सन 2017 चे वेळापत्रक पुढील प्रमाणे राहील. गुरुवार 11 मे 2017 रोजी सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत बांधकाम विभाग. दुपारी 12 ते बदली प्रक्रिया संपेपर्यंत- आरोग्य विभाग. शुक्रवार 12 मे 2017 रोजी सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत अर्थ विभाग, दुपारी 12 ते बदली प्रक्रिया संपेपर्यंत ग्रामपंचायत विभाग. शनिवार 13 मे 2017 रोजी सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत महिला व बाल कल्याण विभाग, दुपारी 12 ते बदली प्रक्रिया संपेपर्यंत सामान्य प्रशासन विभाग. रविवार 14 मे 2017 रोजी सकाळी 10 ते 11 वाजेपर्यंत कृषि विभाग, दुपारी 11 ते 1 पशुसंवर्धन विभाग, दुपारी 2 ते 3 लघुपाटबंधारे विभाग, दुपारी 3 ते बदली प्रक्रिया संपेपर्यंत ग्रामीण पाणी पुरवठा विभाग. सोमवार 15 मे 2017 रोजी सकाळी 10 ते बदली प्रक्रिया संपेपर्यंत शिक्षण प्राथमिक व माध्यमिक विभाग. या सर्व समुपदेशनचे ठिकाण कै. यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हा परिषद नांदेड हे राहील.  या बदलीच्या वेळापत्रकात काही बदल झाल्यास तसे कळविण्यात येईल, असेही प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. 
 
माहूर शासकीय निवासी शाळेत प्रवेश सुरु 
अनुसूचित जाती मुलींची शासकीय निवासी शाळा माहूर येथे इयत्ता सहावी वर्गात ( सेमी इंग्रजी) माध्यमाची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. विनामुल्य अर्ज वाटप चालू आहे. अनुसूचित जाती- 32, अनुसूचित जमाती- 4, विभाभज-2, विशेष मागास प्रवर्ग- एक व अनाथ / अपंगासाठी  एक जागा या सामाजिक आरक्षणानुसार भरती प्रक्रिया चालू आहे, संबंधितांनी अर्ज करावे, असे आवाहन माहूर येथील अनु. जाती मुलींची शासकीय निवासी शाळेचे मुख्याध्यापक यांनी केले आहे. 

जनधन खातेदारांना महाराष्ट्र ग्रामीण बँकेतर्फे रुपे एटीएम कार्डचे 8 मेपासून वितरण 
केंद्र सरकारने दिलेल्या सूचनेनुसार बँकेच्या रोख-रहीत व्यवहार करण्यासंबंधी महाराष्ट्र ग्रामीण बँक क्षेत्रीय कार्यालय नांदेड यांच्याकडून सर्व खातेदारांना रुपे डेबिट एटीएम कार्ड घेण्याचे आवाहन केले आहे. नांदेड जिल्ह्यात एकूण 63 शाखेमार्फत सोमवार 8 मे ते शनिवार 20 मे 2017 पर्यंत गावनिहाय मेळावे घेऊन एटीएम कार्ड वितरीत केले जाणार आहे.    

प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत उघडलेल्या खातेदारांना एटीएम कार्डवर व्यवहार करणे आवश्यक आहे. एटीएम कार्डवर व्यवहार केल्यावरच त्यांना एक लाख रुपये वैयक्तिक अपघात विमा संरक्षण मिळणार आहे. तसेच मेळाव्यामध्ये एटीएम कार्ड वापरण्यासंबंधी माहिती व सूचना बँकेमार्फत देण्यात येणार आहे. प्रधानमंत्री जनधन खातेधारकांनी आपले एटीएम कार्ड घेऊन या योजनेचा लाभ घ्यावा. अधीक माहितीसाठी आपल्या शाखेशी किंवा बँक प्रतिनिधीशी संपर्क साधावा, असे आवाहन क्षेत्रीय व्यवस्थापक महाराष्ट्र ग्रामीण बॅंक क्षेत्रीय कार्यालय नांदेड यांनी केले आहे.  

रास्तभाव धान्य दुकानात मे महिन्याची साखर उपलब्ध
सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍थेअंतर्गत नांदेड जिल्‍हयातील बीपीएल व अंत्‍योदय शिधपत्रिकाधारकासाठी शासनाने मे 2017 साठी नियमित नियतन साखर प्रति व्‍यक्‍ती 500 ग्रॅम प्रमाणे प्रौढ अथवा मूल / बालक असा भेदभाव न करता मंजूर केले आहे. मे 2017 या महिन्‍यात जिल्‍हयासाठी 4 हजार 575 क्विंटलचे नियतन शासनाकडून प्राप्‍त झाले असून पुढील प्रमाणे तालुका निहाय नियतन देण्‍यात आले आहे. या नियतनाची उचल करुन प्रत्‍यक्ष शिधापत्रिकाधारकास संबंधीत स्‍वस्‍त धान्‍य दुकानामार्फत वितरण करण्‍यात येणार आहे. नांदेड व लोहा- 534 , हदगाव- 399, किनवट- 527, भोकर- 175, बिलोली- 287, देगलूर- 255, मुखेड- 487, कंधार- 374, लोहा- 323, अर्धापूर- 128, हिमायतनगर- 198, माहूर- 194, उमरी- 135, धर्माबाद-152, नायगाव- 263, मुदखेड- 144. याची सर्व बीपीएल, अंत्‍योदय शिधापत्रिकाधारकांनी स्‍वस्‍तधान्‍य दुकानातून साखरेची उचल करावी , असे आवाहन जिल्‍हाधिकारी नांदेड यांच्यावतीने जिल्हा पुरवठा अधिकारी नांदेड यांनी  केले आहे. 
 

    Tags