logo

नांदेड, आखाड्यावर झोपण्यास गेलेल्या एकाचा खून केल्याची घटना हदगाव तालुक्यातील इरापूर येथे घडली.

इरापूर येथील आखाड्यावर सोमवारी रात्री 10 वाजता साहेबराव दत्तराव देशमुख हा झोपण्यासाठी गेला होता, मंगळवारी सकाळी तो मृत अवस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती गंगाधर गोपाळराव देशमुख यांनी हदगाव पोलिसांना दिली. उपनिरीक्षक वाघमारे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला यावेळी मयत साहेबराव याचा गळ्यास कशाने तरी आवळल्याचे वळ दिसून आले. तसेच प्रेताच्या बाजूस विषारी औषणाचा डब्बा आढळून आला. पोलिसांनी प्रेताचा पंतनामा केल्यानंतर मयताचा गळा आवळल्याने गुदमरूम मृत्यू पावल्याचा अहवाल आल्यानंतर हदगाव पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरूद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक लटपटे करीत आहेत.

    Tags