logo

BREAKING NEWS

सामाजिक विषमता दूर करणारी "गोदावरी अर्बन" - ना.अर्जुन खोतकर

महिला बचतगट, दुग्धव्यसायिक, लघुउदोजक यांना आर्थिक आधार देऊन त्यांच्या दैनदिन जीवनात बदल घडवित समाजातील आर्थिक विषमता दूर करण्याचे काम गोदावरी अर्बनच्या माध्यमातून होत आहे. असे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास, वस्त्रोउदोग मंत्री अर्जुन खोतकर यांनी केले. गोदावरी अर्बन मल्टीस्टेट, वसमत शाखेचे उदघाटन ना.अर्जुन खोतकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा, माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, संस्थापक अध्यक्ष आमदार हेमंत पाटील, शिवाजी माने, गजानन घुगे, अध्यक्ष राजश्री पाटील, व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. 

पुढे बोलतांना ना.खोतकर म्हणाले की, सहकाराची सुरवात पहिल्यांदा महाराष्ट्रातुन झाली आणि पुढे देशात तिचा प्रसार झाला. राज्यातील सहकार जगाच्या पाठीवर गेला, सहकार हा महाराष्ट्राचा कणा आहे यातूनच गोदावरी अर्बन सारख्या संस्था नावारूपाला येत आहेत. गोदावरी अर्बनच्या माध्यमातून गरजू लोकांना आधार मिळाला आहे. राज्यातील सर्व सहकारी संस्थांनी अशा प्रकारे काम केलं तर समजातील विषमता दूर व्हायला वेळ लागणार नाही असा ठाम विश्वास ना.खोतकर यांनी व्यक्त केला. संस्थापक अध्यक्ष आमदार हेमंत पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले कि, बहुतेक वेळा राष्ट्रीयकृत बँकेमध्ये सर्वसामान्य माणसाला सन्मानाची वागणूक दिली जात नाही. त्यातूनच गोदावरी अर्बनचा उगम झाला आहे. आज महाराष्ट्रात बहुसंख्यने पतसंस्था आहेत पण त्या व्यापारी तत्वावर चालविल्या जात नाहीत गोदावरी अर्बन ही संपूर्णपणे व्यापारी तत्वावर चालणारी संस्था आहे. 

यावेळी संस्थेच्या अध्यक्ष राजश्री पाटील म्हणाल्या कि, प्रशिक्षित कर्मचारी वर्ग हे संस्थेचे बलस्थान आहे. दैनदिन व्यवहारातील प्रत्येक बाबीच्या नोंदी ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जातात, अत्यंत संपन्न लोकहिताचे काम करण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. यावेळी जयप्रकाश मुंदडा, शिवाजी माने , जयप्रकाश दांडेगावकर, गजानन घुगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. समाजातील विशेष काम करणा-या सत्कार मुर्तीचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात संस्थेचे व्यास्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा मांडला सूत्रसंचालन प्रा.नामदेव दळवी केले तर आभार प्रदर्शन शाखा अधिकारी अशोक चोपडे यांनी मानले. यावेळी दादासाहेब भुते, जिल्हासमन्वयक धोंडू पाटील, जिल्हाप्रमुख बाबुराव कदम, उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, नांदेड तहसीलदार किरण आंबेकर, नगराध्यक्ष श्रीनिवास पोजरवार, सिनेट सदस्य अशोक पतंगे, प्रकाश कौडगे, मनोज भंडारी, संस्थेचे सचिव रवींद्र रगटे, संचालक सुरेश कटकमवार, सरव्यवस्थापक वंदना नखाते, प्रशासकीय अधिकारी सुरेखा दवे, संचालक लक्ष्मीनारायण मुरक्या, दीपक मुंदडा, पराग झंवर, छगन जमदाडे, साशिकुमार कुलथे, रोहित नामपल्ली, संभाजी बेले, अशोक बंडे, संभाजी पडोळे, राजेंद्र लालपोतू, संभाजी सिध्देवार, दिलीप भोसले, तुषार लोंढे यांच्यासह समाजातील विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवरानी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

    Tags