logo

नांदेड जिल्ह्यातील हादगावच्या उपजिल्हा रुग्णालयाचे वैदकीय अधीक्षक डॉ. साहेबराव गणपतराव लोमटे वर्ग एक व कक्ष सेवक शेषराव शंकर चव्हान आणी चालक मोहन निवृत्ती नवघडे याना २ हजार ५०० रुपयाची लाच घेताना घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. या कार्यवाहीने वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, लाचलुचपत विभागाकडे लेखी तक्रार देणाऱ्या तक्रारदार यांच्या पत्नीचे प्रसूति व औषध उपचाराचे बिल मंजूर करण्यासाठी, वैद्यकीय अधिकाऱ्यांची स्वाक्षरी लागते. या बिलावर स्वाक्षरी करनेसाठी वैद्यकिय अधीक्षक डॉ. लोमटे, कक्षसेवक चव्हाण यांनी २ हजार ५०० रुपयाची मागणी केली होती. शासनाच्या मिळणाऱ्या अनुदानात अधिकारी डोळा ठेवत असल्याचे लक्षात येताच जागरूक तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड यांच्याकड़े तक्रारदारानी तक्रार केलि होती. सदर तक्रारी वरुण दि.3 में रोजी लाचलुचपत विभागाने उपजिल्हा रुग्नालय हदगाव येथे सापळा रचला. पंचासमक्ष लाचेची मागणी केल्याची पड़ताळनी केलि आसता वैदकीय अधीक्षक डॉ.लोमटे व कक्ष सेवक चव्हान यानी तक्रारदार यांच्या पत्नीचे प्रसूति व औषध उपचाराचे बिल मंजूर करने करता बिलावर स्वाक्षरी करन्यासाठी २ हजार ५००  रुपए लाचेची मांगनी केल्याचे निष्पन्न झाले. यावरुण दि.०३ मे रोजी उपजिला रुग्नालय हदगांव येथे सापळा रचुन वैदकीय अधीक्षक श्री लोमटे यांच्यासह दोघांना लाच स्वीकारल्यानंतर रंगेहाथ पकड़ले आहे. याबाबत हदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक संजय लाटकर, पोलीस उपाधीक्षक संजय कुलकर्णी, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक एस.एस.पालांडे, पो.ना.साजिद अली, पोना.शै.चांद, पो.को. दीपक पवार, पो.को. विलास राठोड, चालक पो.ना.माधव डुकरे आदींनी केली.

    Tags