छत्रपती शिवराय रयतेचे राजे - प्रसिद्ध विचारवंत प्रवीणदादा गायकवाड

हदगाव(शिवाजी देशमुख)छत्रपती शिवरायांनी स्वराज्यामध्ये स्वहितापेक्षा रयतेचे हित जोपासल्यामुळे स्वराज्यातील प्रजा स्वत:पेक्षाही राजावर जास्त प्रेम करत होते. त्यामुळेच छत्रपती शिवराय खरे रयतेचे राजे होते, असे प्रतिपादन महाराष्ट्रातील प्रसिद्ध विचारवंत, वक्ते प्रवीणदादा गायकवाड यांनी शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने लिंगापूर ता. हदगाव येथे जाहीर व्याख्यानाच्या कार्यक्रमात बोलताना आपले मत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे उद्‌घाटक म्हणून हिंगोलीचे खा. राजीव सातव यांच्या हस्ते तर अध्यक्षस्थानी तालुका कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाबुराव पवार पाथरडकर तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुरावजी कदम कोहळीकर, स्वाभीमानी संभाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष संतोष गव्हाणे, मराठा सेवा संघाचे डॉ. गणेश शिंदे, उद्धव पाटील, नानाराव कल्याणकर, स्वाभीमानी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील शिंदे, संभाजी ब्रिगेडचे संजय कदम, जयदीप जाधव, कृषी परिषदेचे संदीप पावडे, संदीप वानखेडे, दिनेश जाधव, शिवाजी जाधव, कॉंग्रेस सोशल मीडियाचे ता.अध्यक्ष रमेश पवार, संतोष माने, गजानन जाधव वाटेगावकर, शाहीर प्रा. शिवराज शिंदे, पंचायत समिती सदस्य राजेश फुलारी आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना गायकवाड यांनी छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये लोकशाही ही संकल्पना रूजू झाली होती. स्वराज्यातील प्रत्येक निर्णय हे सर्वानुमते घेण्यात येत होते. शेतकरी, कष्टकरी, कामगार या सर्वांचे हित छत्रपती शिवराय जोपासत असल्यामुळे प्रत्येकांना स्वराज्य हे आपले वाटत होते. उद्‌घाटकीय भाषणामध्ये हिंगोलीचे खा. राजीव सातव बोलताना छत्रपती शिवरायांनी अठरापगड जातीच्या मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली होती. आजच्या तरूणांनी छत्रपती शिवरायांचा खरा इतिहास समजून घेऊन समाजामध्ये परिवर्तन घडविण्यास प्रयत्नशील रहावे, असे खा. सातव यांनी मत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये संयोजक भागवत देवसरकर यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागची भूमिका सांगितली. यावेळी उपस्थितांना स्वागताध्यक्ष माधव देवसरकर, प्रा.डॉ. गणेश शिंदे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबुरावजी कदम आदींनी छत्रपती शिवरायांबद्दल विस्तृत मार्गदर्शन केले. यावेळी प्रसिद्ध शाहीर प्रा. शिवराज शिंदे यांनी उपस्थित शिवप्रेमी जनतेला छत्रपती शिवरायांचे पोवाडे आणि बहारदार गाण्याने मंत्रमुग्ध करून टाकले.

शिवजन्मोत्सव सोहळ्याला धानोऱ्याचे सरपंच राजेंद्र कदम, करमोडीचे सरपंच अनिल पवार, कामारीचे सरपंच माधव शिरफुले, युवक कॉंग्रेसचे अशोक पाटील, वटफळीचे सरपंच अनिल पाटील, युधिष्ठीर देवसरकर, संदीप काळबांडे, बाबुराव वानखेडे, कैलास पवार, सिताराम पाटील, बाळासाहेब खानजोडे, बशीर पठाण, शरद दुगाळे, राम सूर्यवंशी, शिवाजी शिंदे, विजय पवार यांच्यासह परिसरातील चार ते पाच हजार शिवप्रेमी जनतेची उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्वितेसाठी प्रा. अनिल कवडे, अवधुत पाटील देवसरकर, गजानन देवसरकर, पांडुरंग देवसरकर, शिवाजी देवसरकर, दत्तराव देवसरकर यांच्यासह शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन शिवाजी जाधव तर आभार सचिन उर्फ मुन्ना देवसरकर यांनी मानले.

Related Photos