घारापुर शाळेच्या जोडी बैलाची खिल्लारी गीताने पटकावला प्रथम क्रमांक

हिमायतनगर(साईनाथ धोबे)महाशीवरात्री यात्रा समाप्तीच्या दिशेने वाटचाल करीत असुन, दि. 0६ सोमवारी रात्री संपन्न झालेल्या शालेय विविध कला गुणदर्शन कार्यक्रमात तालुक्यातील ११ शाळांनी सहभाग घेऊन कला - अविष्कार सादर केला. यात घारापुर येथील जिल्हा परीषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी गाण्याच्या माध्यमातुन आम्ही कष्टाळू शेतकरी... काळी आई आमची पंढरी... नांदती भूवरी हि जोडी बैलाची खील्लारी..., शूर शिवबा... महाराष्ट्राची शान शिवबा..., चला जेजुरीला जाऊ... हे गीत सादर करून उपस्थीतांना मंत्रमुग्ध केले. या शाळेतील विदयार्थ्यांच्या सादरीकरणाला प्रथम क्रमांकाचे ४००१ रुपयाचे बक्षीस मंदिर संस्थाचे उपाध्यक्ष महावीराचंद श्रीश्रीमाळ व पदाधीका-यांच्या हस्ते देऊन गौरवीण्यात आले आहे.

तर हिमायतनगर येथील शेखावत आश्रम शाळा हिमायतनगरच्या चिमुकल्यांनी सादर केलेल्या बेटी बचाओचा संदेश देणाऱ्या या गीतावार कला- अविष्कार सादर करुन प्रेक्षकांची दाद मिळवीली. या शाळेस व्दितीय क्रमांकाचे ३००१ रुपयाचे पारीतोषीक शालेय स्पर्धा व्यवस्थापन समितीचे घुंगरे सर, वऱ्हाडे सर यांच्या हस्ते देण्यात आले. तर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खैगावच्या चिमुकल्यांनी सादर केलेल्या गीतास तृतीय क्रमांकाचे १५०१ रुपयाचे बक्षीस समीतीचे सदस्य मुलचंद पिंचा, चाटे सर यांच्या हस्ते देण्यात आले. या स्पर्धेत चिमुकल्या बालकांनी देवा तुज्या व्दारी आलो..., मोरया मोरया... आई भवानी तुझ्या कृपेनी तारसी भक्तांना..., शेतकरी आत्महत्या ...., कर चले हम फिदा जानो तन साथीयो... अब तुम्हारे हवाले वाटण साथीयो..., हे राजे.... जी र जी र जीरजी...., काही ग बाई हळूच मारतोय खडा..., खंडेरायचंय लग्नाला...., शेतकरी आत्महत्या ...., माऊलीची पालखी विठल दर्शनासाठी दिंडीतुन काढुन...., हर हर महादेव..., जाग रे शिवशंकरा तू जाग रे..., विवीध गीतांवन धम्माल सादर करुन चिमुकल्या बालकांनी उपस्थीतांची मने जिंकली. या सांस्कृतीक कार्यक्रमात जि.प.केंद्रीय कन्या शाळा हिमायतनगर, जी.प.शाळा घारापुर, खैरगाव, वडगाव ज., वटफळी, धानोरा, जिल्हा परिषद दिघी, नृसिंह इंग्लिश स्कुल, सायप्रस इंग्लिश स्कुल यासह तालुक्यातील अनेक ठिकाणच्या शाळंानी सहभाग घेतला होता. यावेळी संबंधित शाळेच मुख्याध्यापक, शिक्षक- शिक्षीका, शालेय मुला-मुलींसह त्यांचे पालक, परमेश्वर मंदिर ट्रस्टचे मंदिराच्या सदस्या सौ.लताबाई मुलंगे व श्रीमती मथुराबाई भोयर, आनंता देवकते, यात्रा समीतीचे उपाध्यक्ष सुभाष शिंदे, सचिव संजय माने, अक्कलवाड सर, रायेवार सर, विठ्ठल ठाकरे, एन.टी.जाधव, राम नरवाडे, परमेश्वर पानपट्टे, दिलीप राठोड, संजय मारवार, हनुसिंग ठाकूर, राम सूर्यवंशी, पत्रकार अनिल मादसवार, गजानन चायल, गोविंद शिंदे, प्रकाश साभळकर, देवराव वाडेकर आदींसह मंदिर समिती, यात्रा समिती सदस्य, नागरीक हजारोंच्या संख्येने उपस्थीत होते. या स्पर्धेसाठी विशेष करुन शहर व ग्रामीण परिसरातील महीला पालकांनी उपस्थीती लावली होती.

Related Photos