वडिलांच्या कर्जबाजारीला कंटाळून मुलाची आत्महत्या

हिमायतनगर(प्रतिनिधि)तालुक्यातील मौजे कामारी येथील युवा शेतकरी ज्ञानेश्वर माधवराव शिरफुले वय २२ याने वडीलच्या कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. हि घटना दि. ७ मार्च रोजी सकाळी ६ वाजता उघडकीस आली आहे. मयताच्या आपल्या शेतातील झाडाला गळफास घेतल्याची माहिती गणेश शिरफुले वय ४८ रा. कामारी यानी हिमायतनगर पोलीस स्टेशन दिली. त्यावरून पोलिसांनी घटनास्थळावर भेट देऊन मयताच्या पंचनामा केला. तसेच या घटनेप्रकरणी पोलीस डायरीत आकस्मिक मृत्यू कलम १७४ अनुसार नोंद करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विठ्ठल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल हरण हे करत आहेत.

Related Photos