कर्तबगार महिलांचा हदगांव पोलीसांकडून जागतिक महिला दिनी सन्मान

हदगांव(प्रतिनिधी)तालुक्यातील विविध क्षेत्रात ऊल्लेखनिय काम करणाऱ्या महिलांचा जागतिक महिला दिनाच्या निमीत्ताने हदगांव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या पुढाकाराने पोलीस दलाच्यावतिने सन्मान करून महिलांनी आणखी प्रगती करण्यासाठी प्रोत्साहीत केले.

जागतिक महिला दिनाचे औचित्यसाधून हदगांव पोलीस ठाण्यात समाजातील सर्वच स्तरातील महिलांचा प्रातिनिधीक स्वरुपात सत्कार करून त्यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहूणे म्हणून हदगांवच्या नगराध्यक्षा ज्योती बालाजी राठोड, मुख्याध्यापीका धुळे मॅडम. अपंग विद्यालयाच्या शिक्षीका सारीका सावळे, न्यायालयातील सहाय्यक सरकारी वकील राठोड मॅडम, बाल विकास प्रकल्पाच्या गिरगावकर मॅडम ह्या होत्या. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर हे होते. या कार्यक्रमाचे विशेष आतिथी विविध क्षेत्रातील महिलांचा सत्कार करण्यात आला यात डॉ. सविता मामीडवार (वैद्यकिय), श्रीमती हंगरगे मॅडम (भुमी अभीलेख), श्रीमती गिरगावकर मॅडम (महिला व बाल विकास विभाग), श्रीमती नरबलवार मॅडम ( शिक्षिका), श्रीमती शहाणे मॅडम (नर्सरी स्कूल), श्रीमती ऐश्वर्या मॅडम (ईंग्लीश स्कूल), श्रीमती मस्के मॅडम (दुय्यम निबंधक), यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. सविता मामीडवार, त्रीवेणी झाडे, शिक्षीका भाटे मॅडम यांनी ऊपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.

हदगांव तालुक्याची ऊडनपरी पुणे मेरॅथान मध्ये राज्यातून प्रथम आलेली व ४०० मिटर रिले रेसमध्ये भारतातून प्रथम आलेली सुवर्णपदक विजेती अस्मिता आनेराव, बस मेकॅनिक श्रीमती यु.आर. झापर्डे, व एच.ई. साखरे, ईंदूताई मरशिवने, ऊप विभागीय अधिकारी कार्यालयातील कांताबाई जमदाडे, राज्य स्तरीय क्रिडा स्पर्धेची सुवर्ण पदक विजेती कु अंकीता पतंगे, धावपटू कु. रुपाली भिसे, धावपटू कु. शिल्पा कवाणे, सांस्कृतीक कार्यक्रमाच्या संचालीका कु. तबस्सूम शेरखॉ पठाण, विशाखापट्टनम येथून रोप्यपदक मिळवणारी तेजस्वीनी पांचाळ, कराटे मध्ये कांश्यपदक विजेती कु. रुपा जाधव, सौ. विद्या सुदर्शन धांदू, सौ. मोरेकर मॅडम, विधवा असून भाजीपाला विकून कुटूंब चालवणारी गृहीणी सखूबाई काळे, सहशिक्षिका त्रीवेणी झाडे, मुकबधिर विद्यालयाच्या श्रीमती सारीका गणेसराव सावळे, ऊर्दू शिक्षीका मुन्नी बेगम शेख अब्दुल्ला सहशिक्षीका व करोडपती फेम अर्चणा रमेश हाराळे, ग्रामीण भागाच्या वैद्यकीय डॉ. सारीका जैन, वन विभागाच्या एकता कावळे यांचा प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला.

Related Photos