मुस्लिम बांधवांच्या वतीने यात्रेकरूंसाठी थंड पेयजल

हिमायतनगर(प्रतिनिधी)गेल्या महिन्याभरापासून उन्हाचे चटके बसू लागल्याने अंगाची लाही लाही होत आहे. याचा फटका परमेश्वर यात्रेतील नागरिकांना बसू नये म्हणून शहरातील मुस्लिम बांधवांच्या वतीने थंड व शुद्ध पेयजलाची सोय करण्यात आली आहे.

याचे उदघाटन दि.०९ गुरुवारी येथील प्रसिद्ध व्यापारी मजहर मौलाना व शहराचे प्रथम नगराध्यक्ष अ.अखिल अ.हमीद यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अनिल पाटील, अन्वर खान पठाण, सदाशिव सातव, सरदार खान, असलम सेठ, अर्शद भाई, अजीज भाई, समद कंपनी, अमेहद खुरेशी, शफी भाई, राहूल लोणे, शेख रहीम, ज्ञानेश्वर शिंदे, कुणाल राठोड, सावन डाके, विनायक मेंडके, सौ. लक्ष्मीबाई भवरे, विठ्ठल ठाकरे, संजय माने, परमेश्वर उट्टलवाड, जाहेद कासिम, अब्दुल अजीज, फेरोजखान, असलम खान, मं.जावेद भाई, इरफान खान, खुदुस मौलाना, मसुद खान, जावेद खान, अक्रम मौलाना, अहाद खान, खलील मौलाना, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार सांघाचे तालुकाध्यक्ष पांडुरंग गाडगे, प्रकाश जैन, कानबा पोपलवार, अनिल मादसवार, साईनाथ धोबे, फाहद खान, संजय कवडे, विष्णू जाधव, यांच्यासह अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Photos