पोलीस कॉलनीची चिरंजीवीप्रसाद यांनी केली पाहणी

हिमायतनगर(प्रतिनिधी)येथील नगरपंचायतीच्या हद्दीत येणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या क्वार्टरची दुरावस्था व पाणी टंचाईची समस्या वाढली आहे. शहरवासीयांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने दि.०९ गुरुवारी विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीवी प्रसाद, पोलीस अधीक्षक निसार तांबोळी यांनी भेट देऊन पाहणी केली.

यावेळी नगरपंचायतीचे नगराध्यक्ष अ.अखिल अ.हमीद यांनी श्री चिरंजीवीप्रसाद याना निवेदन देऊन नगरपंचायत हद्दीत सुसज्ज नवीन पोलीस कॉलनी निर्मितीसाठी निधी उपलब्ध होणार आहे. त्यासाठी नवीन जागेत स्थलांतर व बांधकाम करू आणि त्याच्या बदल्यात शहरातील नागरी सुविधेच्या दृष्टीने योग्य असल्याने सध्याची कॉलनीची हि जागा नागरपंचायतीला देऊन करावी. आणि शहरवासीयांसह पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुविधेसाठी सहानुभूतीपूर्वक विचार करावा अशी मागणी केली. यावेळी पोलीस निरीक्षक विठ्ठल चव्हाण, अनिल पाटील, अन्वर खान, फेरोज खान पठाण, सदाशिव सातव यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

Related Photos