होळीसह येणारे सणउत्सव शांततेत साजरे करा - चिरंजीव प्रसाद

हिमायतनगर(अनिल मादसवार)तालुक्यातील जनतेने आगामी काळातील होळी, गुढीपाडवा, राम नवमी, हनुमान जयंतीसह येणारे सण उत्सव शांततेत पार पाडावे. असे आवाहन विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीवी प्रसाद यांनी केले.

ते हिमायतनगर येथील पोलीस स्थानकांच्या वार्षिक तपासणीसाठी आले असता बोलत होते. याप्रसंगी त्यांच्यासोबत पोलीस अधीक्षक निसार तांबोळी यांची उपस्थिती होती. प्रथम शहरात दाखल होताच येथील पोलीस निरीक्षक विठ्ठल चव्हाण यांनी स्वागत केले. तसेच कर्मचाऱ्यांनी शिरोमणी गार्डने बिगुल वाजवून सलामी दिली. यावेळी हिमायतनगर शहरवासियां कडून त्यांचा पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला. श्री चिरंजीवी प्रसाद यांनी पोलीस स्थानकांच्या नूतन इमारतीची, कारागृहाची, यासह वर्षभराच्या कामकाजाच्या अहवालाची पाहणी करून आढावा घेतला. त्यानंतर येथील पोलीस कर्मचाऱ्यांच्या वसाहतीला भेट देऊन पाहणी केली. तसेच त्याच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी किनवट डिव्हिजन मधील सिंदखेड, मांडावी, इस्लापूर, किनवट, माहुर, येथील पोलीस अधिकारी - कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा केली. यावेळी नगरपंचायतीचे नगराध्यक्ष अ.अखिल अ.हमीद, अनिल पाटील, मं.जावेद, रामभाऊ ठाकरे, गौतम पिंचा, सरदार खान, लक्ष्मीबाई भवरे, अन्वर खान, फेरोज खान पठाण, सदाशिव सातव, अनंता देवकते, संजय माने, राहुल लोणे, यांच्यासह पत्रकार, पोलीस पाटील, व पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थिती होते.

Related Photos