दिघीत अखंड दत्तनाम,पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन

हिमायतनगर(प्रतिनिधि)तालुक्यातील श्री दत्त संस्थान दिघी येथे अखंड दत्तनाम व पुण्यतिथी सोहळा तसेच महाप्रसादाचे दि. ११ मार्च रोज शनिवार पासून ते दि. १८ मार्च पर्यंत आयोजित करण्यात येत आहे.

या सप्ताहात दैनंदिन कार्यक्रम रोज सकाळी २ ते ५ भुपाळ्या ,६ ते ९ बाळक्रिडा ग्रंथाचे पारायण व सोळस आनंद दत्त महापूजा राहणार संत श्री अमृतगिर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आहे, दुपारी २ ते ४ जीवन मुक्त ग्रंथाचे निरूपण होईल, तर दि. १७ ला सायंकाळी ७ ते ९ पर्यंत मंहत गोपाळगिर महाराज यांचे परज्ञाणी प्रवचन आहे, दि. १८ ला हे. भ. प. व्यंकटेश महाराज कामारीकर यांचे प्रसादावरील (काल्याचे) किर्तन आहे. यासाठी दि. १७ मार्च शुक्रवार रोजी सकाळी ११:११ वाजता पंचायत. पं. पु. संत श्री. देवगिरी महाराज व संत श्री गंगागीर महाराज यांचे समाधी अभिषेक. त्यानंतर दुपारी २ ते ५ वाजेपर्यंत व रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यं १२८ श्रीफळाची व सव्वा खंडी तांदूळची महापूजा व महाप्रसाद होणार आहे. श्री श्री १००८ श्री मंहत गोपाळगिर महाराज दत्त बर्डी हदगांव, संत श्री व्यंकटस्वामी महाराज पिंपळगाव, संतश्री दयाळगिर महाराज हरडप, संतश्री देवगिर महाराज मुळावा, संतश्री दत्तगिर महाराज एकखरी यांच्या उपस्थितीत लाभणार आहे. या कार्यक्रमाचा परिसरातील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन संतश्री देवगिरी गुरू आनंदगिर महाराज व विश्वस्त मंडळी व गांवकरी मंडळी दिघी. ता. हिमायतनगर यांनी केले आहे.

Related Photos