पोटा बु.येथे फुलाजी बाबाच्या आध्यात्मिक सत्संग सोहळ्याचे आयोजन

हिमायतनगर(प्रतिनिधि)तालुक्यातील मौजे पोटा बु.येथे श्री.श्री. श्री. संत फुलाची बाबा आध्यात्मिक सत्संग सोहळा दि. १७ मार्च सकाळी ११ वाजता ध्वजारोहणचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर श्री संत फुलाची बाबा यांचे प्रवचन व मार्गदर्शन होणार आहे.

तत्पुर्वी दि १६ मार्च गुरुवार रोजी रात्री ८ वाजता भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने सभामंडपाचे उद्घाटन श्री संत फुलांची बाबा व हिंगोली मतदार संघाचे खा. राजीव सातव करणार आहेत. तसेच प्रमुख पाहुणे हदगाव /हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे आ. नागेश पाटील आष्टीकर, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. आ. माधवराव पाटील जवळगावकर, प्रमुख जि. प. सदस्या श्रीमती शांताबाई पवार, ज्योत्सना नरवाडे. पं. स. सदस्य सुरेखा आडे, के. जे. वाळके, सौ. माया राठोड, शशिकलाबाई कौठेकर यांची उपस्थिती लाभणार आहे.

कार्यक्रमानंतर लगेच महाप्रसाडचे आयोजन करण्यात आले असून यासाठी पोटा बु.सह मुरझळा, नखात्याची वाडी, तळ्याचीवाडी, दगडवाडी, महादापूर, चिंचोडीं, जिरोणा, रमणवाडी, गणेशवाडी, पिचोंडी, सवना, सोनपेठ, एकघरी, पार्डी, बार्हाळी तांडा,ताडाची वाडी, भिश्याचीवाडी, वडाचीवाडी, वाळकेवाडी, वायवाडी, दरेसरसम, वाशी, दाबदरी, सरसम, पवना इत्यादी ठिकाणची स्वयंसेवक व भक्तगण उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रम्स पंचक्रोशीतील नागरिकांनी उपस्थित होऊन धर्म अध्यात्माचा लाभ घ्यावा असे आवाहन गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Photos