Breaking news

पिकअप व्हैनची रेल्वेगेटच्या कठड्याला धडक.. चालकाचा मृत्यू

हिमायतनगर(कानबा पोपलवार)नांदेड - किनवट रोडवरील रेल्वे गेटजवळील कठड्याला एका पीकप व्हैनची जोरदार धडक बसल्याने चालक गंभीर जखमी झाल्याने नांदेडकडे नेताना त्यांचा वाटताच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हि घटना दि.१३ रंगपंचमीच्या दिवशी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली.

हिमायतनगर शहरातून भोकरकडे जाणाऱ्या महिंदा पिकअप व्हैन क्रमांक एपी ०१ - वाय ०२२८ या मालवाहू गाडीने रेल्वे गेटजवळील कठड्यास जोराची धडक दिली. या अपघाताच्या घटनेत गाडीच्या समोरील भाग चक्काचुर झाल्याने मोठे नुकसान झाले. चालक छगन बक्केवाड वय ४२ हा गंभीर रित्या जखमी झाला होता. घटना पाहणाऱ्यांची तातडीने त्यास येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेडला शासकीय रुग्णालयात रवाना केले होते. दरम्यान १०८ गाडीतून भोकरपर्यंत जाताच चालकाचा मृत्यू झाला. ऐन सणासुदीत हि दुःखद घटना घडल्याने गावावर शोककळा पसरली आहे.

Related Photos