Breaking news

पंसच्या सभापतिपदी सौ.माया राठोड तर उपसभापतीपदी वाळके यांची निवड

हिमायनगर(प्रतिनिधी)नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीनंतर दि.१४ रोजी पंचायत समितीच्या सभापतिपदी काँग्रेस आयचे नवनिर्वाचित सदस्या सौ.माया दिलीप राठोड तर उपसभापतीपदी खोबाजी वाळके यांची निवड पीठासीन अधिकारी तथा तहसीलदार गजानन शिंदे, गटविकास अधिकारी सुहास कोरेगाव यांच्या उपस्थितीत करण्यात आली आहे.

जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत काँग्रेस - सेनेच्या उमेदवारात सरळसरळ लढत झाली यात दुधड, सरसम जिल्हा परिषद गट आणि सरसम, सिरंजनी, दुधड आणि वाळकेवाडी पंचायत समिती गणातून असे सहाही सदस्य निवडून आल्याने काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकला होता. आज दि.१४ मार्च २०१७ रोजी येथील पंचायत समितीच्या कै. वसंतराव नाईक सभागृहात पंचायत समितीच्या सभापती, उपसभापतीची निवड करण्यात आली. निवडणुकीतून विजयी झालेल्या सरसम पंचायत समिती गणाच्या सदस्या सौ. माया दिलीप राठोड, सिरंजनी पंचायत समिती सदस्यता सौ. शशिकलाबाई कौठेकर, दुधड पंचायत समिती सदस्या सौ. सुरेखा बापूराव आडे, कामारी पंचायत समिती सदस्य खोब्राजी वाळके यांची उपस्थिती होती. १२ वाजता दाखल झालेल्या नामांकनावर उपस्थित सर्व सदस्यांनी हात उंचावून सौ.माया दिलीप राठोड यांच्या सभापतिपदाला तर उपसभापतीपदी खोबाजी वाळके यांना पाठिंबा दिल्याने निवड जाहीर करण्यात आली आहे. यावेळी तालुकाध्यक्ष विकास पाटील देवसरकर, नगराध्यक्ष अ. अखिल अ. हमीद यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्याने शाल - श्रीफळ देऊन सत्कार करून भावी कार्यास शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी माजी.प.स.सभापती जोगेंद्र नरवाडे, वामनराव वानखेडे, दिलीप राठोड, शिवाजी पाटील सिरपल्लीकर, माजी सरपंच शे.चांदभाई, डॉ.प्रकाश वानखेडे, परमेश्वर गोपतवाड, सचिन राठोड, सुनील वानखेडे, अतुल वानखेडे, साईनाथ शिंदे, बापूराव आडे, दगडू काईतवाड, ज्योतीताई पार्डीकर, सदाशिव सातव, नारायण देवकते, संजय माने, आदींसह अनेकांची उपस्थिती होती.

Related Photos