जगदगुरु तुकाराम महाराज यांच्या ७५ व्या सुवर्णमहोत्सवी बीजोत्सव साजरा

हिमायतनगर (प्रतिनिधि) तालुक्यातील मौजे वडगांव (ज) येथे ७५ व्या अमृत महोत्सवि वर्षानिमित्त गेल्या सात दिवसापासून ह.भ.प. तुकाराम महाराज फुटानकर व ह.भ.प. भागवताचार्य भिमराव महाराज फुटानकर याच्या मार्गदर्शनाखाली अंखड हरिनाम सप्ताह तथा श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा आणि श्री संत शिरोमणी जगदगुरु तुकाराम महाराज बीजोत्सव सप्ताह भव्य शोभा यात्रेने साजरा करण्यात आला आहे.

त्या निमित्त येथील मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह, श्रीमंत भागवत कथा सप्ताह ज्ञानयज्ञ सोहळा आयोजित करण्यात आला होता. यात गाथा पारायण, विणा पारायण, हरिपाठ - हरिकिर्तन व बुधवारी संत तुकाराम महाराजांची पालखी शोभा यात्रा काढून सप्ताहाची सांगता करण्यात आली. या शोभा यात्रेत लहान थोर मुली - मुलांनी डोक्यावर भागवत ग्रंथ घेऊन सामील झाले होते. तर भाजणी मंडळींनी ताल मृदंगाच्या तालावर भक्तिगीतात न्हाऊन गावकर्यांना आकर्षित केले होते. दरम्यान शोभा यात्रेचे ठिकठिकाणी स्वागतासाठी घरसमोर रांगोळी टाकून पालखी येताच पूजन करून अनेक गृहिणींनी आशीर्वाद घेतले. यावेळी तालुक्यातील व पंचक्रोशीतील नागरिक भक्तांनी हजारोच्या संख्येने उपस्थिती लावली होती. दरम्यान सप्ताहभर ह.भ.प. दिलीप महाराज साखरेकर व ह.भ.प. पोतन्ना बापु खैरगांवकर यांनी गाथा पारायण व्यासपीठ सांभाळले. ह.भ.प. लक्ष्मणराव मुत्तेलवाड यांनी विणा पारायणची प्रमुख जबाबदारी सांभाळली. ह.भ.प.बापुराव बनसोडे यांनी चोपदार जिम्मेदारी निभावली, ह.भ.प.प्रविण शास्त्री महाराज केळीकर, ह.भ.प. श्यामसुंदर महाराज आष्टीकर, ह.भ.प. रमेश महाराज बुचाले पुर्णा, ह.भ.प. माधव महाराज बोरगडीकर, ह.भ.प. गणपतराव पवार गुरुजी अंबाळेकर, ह.भ.प.मोहन महाराज कावडे हासनाळीकर, ह.भ.प. भिमराव महाराज फुटानकर, बुधवार दि.१४ रोजी ह.भ.प. प्रा. सु.ग. चव्हान यांच्या मधुर वाणीत काल्याचे किर्तनातुन उपस्थितांना भक्तिमार्ग दाखविला. यावेळी भव्य महाप्रसादाचा लाभ उपस्थित भक्तांनी घेतला. सदरील कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी येथील बालाजी गाडेवाड, बालाजी करेवाड, महेश ताडकुले, मारोती गायकवाड, आदींसह गावकर्यांनी परिश्रम घेतले.

तुकाराम महाराज बीज उत्सव फार पूर्वीपासून चालत आलेला आहे, गेल्या ७५ वर्षांपासून वडगाव येथे बीजोत्सव साजरा केला जातो. सात दिवस अन्नदान, भजनीमंडळाचे सहकार्य मिळते तुकाराम महाराजांच्या आशीर्वादाने आमच्या गावात सुख शांती लाभते अशी प्रतिक्रिया येथील जेष्ठ नागरिक हभप. यादवराव कामनवाड यांनी दिली.

या ठिकाणची बीजेची परंपरा येहळेगावचे परमहंस चैतन्य तुकुबेराय यांनी घालून दिलेली परंपरा आहे. त्यांचे चार शिष्य होते. ब्रह्मचैतन्य गोंदवले महाराज, सद्गुरु भिमाजी बापू, नंदी महाराज तथा रामबापू, सद्गुरु भिमाजी बापू फुटाणकर यांनी या परिसरात येऊन सर्वांच्या उद्धारासाठी प्रयत्न केले. त्यांनी घालून दिलेली हि परंपरा पूर्वापार चालत आहे. येथून जवळचा असलेले सिबदरा येथे भिमाजी बापू पुण्यतिथी व बीजोत्सव दोन्ही कार्यक्रम जड जाऊ नये म्हणून बीजोत्सव वडगाव येथे सुरु केला होता अशी माहिती हभप.भीमराव महाराज फुटाणकर यांनी दिली.

Related Photos