स्वच्छता व शौचालय बांधकामे करून तालुका हागणदारीमुक्त करा - जवळगावकर

हिमायतनगर(अनिल मादसवार)गावातील स्वच्छता व शौचालय बांधकामांना जास्तीत जास्त प्रधान्य देऊन तालुका हागणदारी मुक्त करावा असे आवाहन माजी आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी केले. ते हिमायतनगर येथील नवनिर्वाचित सभापती - उपसभापती यांच्या दि. १६ मार्च रोजी संपन्न झालेल्या पदग्रहण सोहळ्या प्रसंगी बोलत होते.

यावेळी मंचावर गटविकास अधिकारी सुहास कोरेगाव, काँग्रेस आयचे तालुकाध्यक्ष विकास पाटील, माजी जी.प.सदस्य सुभाषदादा राठोड, माजी सरपंच चांद भाई, नगराध्यक्ष अ. अखिल अ. हमीद, प.स. नवनिर्वाचित सभापती सौ. माया राठोड, उपसभापती खोब्राजी वाळके, प.स.सदस्य सौ.सुरेखा आडे, सौ. शशिकलाबाई कौठेकर, बळीराम देवकते, डॉ. प्रकाश वानखडे, विस्तार अधिकारी रविराज क्षीरसागर यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांचा सत्कार करण्यात येऊन भावी कार्यास शुभेच्छा दिल्या. तसेच पुढे बोलताना जवळगावकर म्हणाले की, तालुक्यातील बहूतांश गावात पाणी टंचाई वाढली आहे. यासाठी सभापती - उपसभापती व सर्व पंचायत समिती सदस्यांनी आपापल्या भागातील समस्या सोडविण्यावर भर द्यावा. तसेच शासनाच्या स्वच्छता अभियानाला गतिमान करून जास्तीत जास्त गावे हागणदारीमुक्त करावेत. आणि शिक्षणाच्या समस्येकडे प्रामुख्याने लक्ष केंद्रित करून गुणवत्ता वाडीबरोबर डिजिटल शाळा करून शैक्षणिक गुणवत्तेत भर पाडावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. हदगाव /हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. माधवराव पाटील जवळगावकर यांच्यासमोर दगडवाडीसह अनेक गावातील पाणी टंचाई यासह शौचालय बांधकामाच्या निधी आणि अन्य कामाबाबतचे प्रश्न उपस्थित झाले होते. या सर्व बाबीकडे नवनिर्वाचित पदाधिकारी - गटविकास व संबंधित ग्रामसेवकांनी गांभीर्याने घेऊन या समस्या सोडवाव्यात अश्या सूचनाही यावेळी केल्या. याप्रसंगी दिलीप राठोड, अनिल पाटील, प्रभाकर मुधोळकर, अशोक आडे, लक्ष्मीबाई भवरे, सदाशिव सातव, दिलीप राठोड, फेरोजखान युसूफखान, बापूराव आडे, सचिन राठोड, खालिद भाई, त्रिरत्न भवरे, परमेश्वर गोपतवाड, प्रकाश जैन, पांडुरंग गाडगे, साईनाथ धोबे, कानबा पोपलवार, यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

पोस्टमनची भूमिका साकारून सर्वसामान्यांपर्यंत शासनाच्या योजना व त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच पंचायत समितीमध्ये आजवर झाले ते झाले, यापुढची बेशिस्ती व कामचुकार कदापि खापवून घेतला जाणार नाही. आमची लढाई ही पदावरील संबंधितांशी आहे, त्यासाठी कामे पूर्णत्वास नेऊन ग्रामीण भागात जास्तीत जास्त योजना अमलात आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन नवनिर्वाचित सभापती सौ.माया राठोड यांनी पद्ग्रहणानंतर उपस्थितांना दिले.

Related Photos