Breaking news

प्रलंबित मागण्यासाठी रास्तभाव दुकानदारांचे धरणे

हिमायतनगर (प्रतिनिधी) तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या प्रलंबित मागण्यासाठी तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

दि.१७ मार्च रोजी सकाळी ११.३० वाजता हिमायतनगर तालुक्यातील रास्त भाव दुकानदार संघटनेच्या सर्व दुकानदार व पदाधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक धरणे आंदोलं करून मागण्याचे निवेदन पुरवठा अधिकारी मुंडे यांच्याकडे सादर केले. गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र शासनाकडे मागण्या करूनही त्या मान्य होत नसल्याने रास्त भाव दुकानदार दिवसेंदिवस आर्थिक कोंडीत सापडत चालला आहे. यात अण्णा सुरक्षा योजनेअंतर्गत धान्याची वाहतूक घरपोच व हमालीमुक्त होणे गरजेचे असताना ते अजपावेतू करण्यात आलेले नाही. तामिलनाडुच्या धर्तीवर अन्न महामंडळ स्थापन करून रास्तभाव दुकानदारांना शासकीय सेवेत सामावून घेत ३० हजार ५०० रुपये मानधन देण्यात यावे. शिधापत्रिकांची नोंदणी शासकीय यंत्रणेमार्फत विनाशुल्क करण्यात यावी. रास्त भाव दुकानदारांना ईपोस मशीनचे पूर्ण प्रशिक्षण देऊनच ती वापरण्यात यावी. यासह अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या. तसेच दि.२० मार्च रोजी सदरील मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी नवी दिल्ली येथील जंतर मंतर मैदानावर भव्य मोर्च्याचे आयोजन करण्यात आले असून, यात तालुक्यातील सर्व दुकानदार उपस्थित राहणार असल्याचे आंदोलंकर्त्यानी सांगितले. यावेळी तालुकाध्यक्ष दशरथकाका गोसलवाड, अनंता देवकते, शे.मसूद शे.मोहिद्दीन, नंदकुमार पळशीकर, पांडुरंग गाडगे, शंकर पळशीकर, विलास तुप्तेवार, बापूराव आडे, पांडुरंग सूर्यवंशी, दगडू खरोडे, शिवाजी फुलके, राजेश्वर रायेवार, माधव शिरफ़ुले, प्रभू पिटलेवाड, शे.रफिक, शेळके, सुददलवाड, बाबुराव गड्डमवाड, ढोणे, सुरेश पाटील टेम्भूर्णीकर, रमेश आडे, चिंतावार, कोमावार, शिंदे, यांच्यासह तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Photos