Breaking news

गांजेगाव बंधाऱ्याचे गेट उघडल्याने पुढील गावकऱ्यांची तहान भागणार

हिमायतनगर(प्रतिनिधि)जिल्हाधिकारी नांदेड व यवतमाळ याच्या आदेशानुसार पैनगंगा नदीत इसापूर धरणाचे पाणी कालव्याद्वारे सोडण्यात आले होते. परंतु गांजेगाव येथील बंधाऱ्याचे गेटबंद असल्याने पुढील गावकर्यांना पाणी मिळत नव्हते. हा प्रकार लक्षात येताच पुढील गावकर्यानी तात्काळ गांजेगाव पुलावरील बंधाऱ्याचे गेट काढण्यात यावे व सोडलेले पाणी बिटरगाव पेंडापर्यंत येत नाही तोपर्यंत उघडलेले गेट बंद करण्यात येऊ नये अशी मागणी निवेदनाद्वारे केली होती. तर अलीकडील गावकऱ्याची गेट काढू नये म्हणून निवेदन दिले होते. दोन्ही भागाकडे गावकऱ्यांचा संघर्ष वाढण्याची भीती लक्षात घेऊन प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात दि.१९ मार्च रोजी गेट काढून पाणी पुढे सोडले आहे. यामुळे पुढील गावकऱ्यांची तहान भागणार आहे.

तालुक्यातील पैनगंगा नदी कोरडीठाक पडल्याने इसापूर धरणाचे पाणी सोडावी अशी मागणी केली होती. पाण्यासाठी नदीकाठावरील नागरिक त्रस्त असल्याचे लाईव्ह वृत्त नांदेड न्यूज लाइव्हने दि.०५ मार्च रोजी प्रकाशित होताच प्रशासन कुंभकर्णी झोपेतून जागे झाले. आणि जिल्हाधीकाऱ्यांच्या आदेशाने इसापूर धरणातून कलाव्यद्व्यारे पाणी सॊडण्यात आले होते. हे पाणी गांजेगाव येथील बंधाऱ्याजवळ पोचल्याचे समजताच या पाण्याचा फायदा बंधाऱ्याखालील सीरप्पली, शेलोडा, एकंबा, कौठा, कौठा तांडा, बोरगडी, धानोरा, वारंगटाकळी सह विदर्भातील काही गांवच्या नागरिकांना व्हावा. म्हणून समोरील गावाचे रामराव कदम, राजू भोयर, कृष्णा जाधव, संजय नामदेव, शंकर गावंडे, मारोती कदम गंगाधर दवणे, संतोष शिंदे, मदनराव जाधव यांच्यासह अनेकांनि वरिष्ठांना निवेदन देऊन बंधाऱ्याचे गेट उघडण्यात यावे अशी मागणी केली होती.

तर आज घडीला बंधाऱ्याच्या वरच्या भागात ओव्हर प्लो होण्यापूर्वीच पाणी खालील गावाकडे जाऊ नये आणि गांजेगाव बांधार्याच्या वरचा भाग पाण्यापासून वंचित राहू नये म्हणून अलीकडील भागातील गावांना पाण्याचासाठा होईपर्यंत धरणाचे पाणी काही दिवस तरी सोडणे चालू ठेवावे अशी मागणी दि.१७ रोजी डॉ. प्रकाश वानखेडे, तुकाराम देवसरकर, चांदराव वानखेडे, नागोराव शिंदे, मारोती वानखेडे आदींसह अनेक पळसपूरवासीय नागरिकांनी निवेदनाद्वारे केली होती. कारण अजूनही तीन महिने भीषण पाणी टंचाईचा काळ बाकी आहे, आत्ताच पाण्याची हि अवस्था झाली तर येणारे तिन महिने थेंब थेंब पाण्यासाठी भटकंती करावी लागणार असल्याचे म्हंटले होते.

गेट उघडण्यावरून खालील व वरील भागातील नागरिकात वाद होऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्तात पळसपूरच्या नागरिकाचा विरोध पत्करून दि.१९ रोजी गांजेगाव बंधाऱ्याचे एक गेट सार्वजनिक बांधकाम विभागाचे चन्द्रवंशी, पोलीस निरीक्षक विठ्ठल चव्हाण, नायब तहसीलदार गायकवाड, मंडळ अधिकारी राठोड, तलाठी जाधव, यांच्यासह या भागातील अनेक नागरिक व प्रशासनाचे कर्मचारी यांच्या उपस्थितीत उघडण्यात आले आहे.

अन्यथा पुन्हा पाण्यासाठी आंदोलने करावे लागणार
------------------
इसापूर धरणातून सोडलेले पाणी अजूनही पळसपूरसह बर्‍याच गांवापर्यंत पोहोचलेच नसतेवेळी काही कार्यकर्त्यांनी पाणी आल्याचा गवगवा केला होता. पाणी येण्यापूर्वीच शिमगा केल्यागेल्याने प्रशासनाला नागरिकांच्या मागणीवरून गांजेगाव पुलाच्या बंधाऱ्याचे गेट उघडावे लागले. त्यामुळे इसापूर यामधून सोडल्या जाणारे पाणी बंद झाल्यास पुन्हा नदीकाठावरील नागरिकांना पाण्यासाठी आंदोलन, मोर्चे तथा जिल्हाधिकायापर्यंत निवेदने देऊन पाणी मागण्याची वेळ येणार असल्याचे चित्र आजच्या परिस्थितीवरून दिसत आहे.

नांदेड न्यूज लाईव्हचे दि.०५ मार्च रोजीचे लाइव्ह वृत्त पाहण्यासाठी पुढील लिंक क्लिक करा https://youtu.be/gFUrqJ_rsq0

Related Photos