BREAKING NEWS

logo

नांदेड, पोलीस अधिक्षक चंद्रकिशोर मिणा यांच्या विशेष पथकाने हिमायतनगर हद्दीत काळ्या बाजारात जाणारा १७ क्विंटल गहु पकडला आहे. त्यासोबत एक चार चाकी गाडी ४ लाख रुपयांची असा एकूण ४  लाख २८ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

पोलीसांनी प्रसिध्दीसाठी पाठविलेल्या माहितीनुसार दि.१२ जून २०१७ रोजी विशेष पथक प्रमुख ओमकांत चिंचोलकर व त्यांचे सहकारी पोलीस निरणे, कुलकर्णी, जगताप, जिंकलवाड, आवातिरक, गंगुलवार हे हिमायतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त करीत होते. दरम्यान बोरगडी रोड  मार्केट कमिटीच्या मोकळ्या जागेत गेले असता त्या ठिकाणी चार चाकी गाडी क्रमांक एम.एच.२० बी.टी.९३७  उभी होती. त्यात पाहणी केली असतांना पांढऱ्या पोत्यात बांधलेले ३२ गहू कट्टे होते. हे गहुकट्टे शासकीय राशन दुकानाचे होते. या १७ क्विंटल गव्हाची किंमत २८ हजार ९०० रुपये आणि चार चाकी गाडी ४ लाख रुपयांची असून सदरचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच आरोपी शे.मुनीर शेख छोटुमीया वय ४० वर्ष रा.उमरचौक, हिमायतनगर यास ताब्यात घेण्यात आले आहे. हा गहू सरकारी राशनचा असून अवैधपणे काळ्या बाजारात विक्रीसाठी जात होता, म्हणून ही धरपकड झाली असल्याचे पथक प्रमुख ओमकांत चिंचोलकर यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना सांगितले. त्यामुळे सध्या एकाविरुध्द हिमायतनगर पोलीस ठाण्यात जिवनावश्यक वस्तू अधिनियमाचे कायद्याखाली ३,७, भादंवि कलम  ४२०, गुन्हा दाखल करण्यात आला आहे .पुढील तपास हिमायतनगर पोलीस करणार असून, सदरचा गहू कोणी दिला, कुठून आणला, कोणाचा होता, यात कोण कोण सामील आहे. याची माहिती घेऊन सदरच्या गुण्याबाबत शासकीय गोदामपालसह, काळा बाजार करणाऱ्या एका काँग्रेस पुढार्यांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यताही त्यांनी पत्रकारांशी बोलताना वर्तविली. यासाठी आता हिमायतनगरचे स्थानिक पोलीस कोणत्या दिशेने तपास करेल. कि मागल्याप्रमाणे तपास भरकटणार की..? योग्य मार्गाने मुख्य आरोपी अटक करणार याकडे शहरासह तालुकावासीयांचे लक्ष लागून आहे   

    Tags