BREAKING NEWS

logo

हिमायतनगर, हिंगोली मतदार संघात येणाऱ्या नांदेड - आदिलाबाद लाईनवरील किनवट, माहूर, हिमायतनगर, भोकर, आदींसह तेलंगणा राज्यातील प्रवाश्यांच्या रहदारीसाठी व रेल्वेच्या फायद्यासाठी निझामाबाद - पंढरपूर प्रमाणे आदिलाबाद - पंढरपूर गाडी कायमस्वरूपी सुरु करून धनबाद एक्सप्रेसला हिमायतनगर येथे थांबा द्यावा अशी मागणी मुलचंदजी पिंचा यांनी एका निवेदनाद्वारे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, खा. राजीव सातव यांच्याकडे केली आहे.

हिमायतनगर तालूक्यासह विदर्भ व तेलगंना राज्यातून अनेक भाविक तसेच व्यापारी वर्ग नियमित पणे रेल्वेने ये - जा करत आहेत. परंतु या मार्गावर रेल्वेगाडया जास्त नसल्याने अनेक प्रवासी नांदेड रेल्वे स्थानक तून रेल्वेचा पुढील प्रवासासाठी हिमायतनगर येथून जावून पुढील रेल्वे प्रवास करत आहेत.  त्यामुळे व्यापारी, भाविक व रुग्णांना औरंगाबाद, पुणे, हैदराबाद, नागपूर, तसेच बाहेरील राज्यात जाण्यासाठी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. गेल्या काही वर्षांपासून जशी निजामाबाद - पंढरपूर, अकोला - पंढरपूर गाडी सुरु करण्यात आली. त्याच धर्तीवर आदिलाबाद -किनवट - नांदेड - पुर्णा - परभणी - परळी -  पंढरपूर अशी नियमित (दररोज) रेल्वेगाडी सुरु करावी. त्यामुळे रेल्वेच्या उत्पन्नात तर वाढ होईलच भाविक भक्तांना तुळजापूर, माहुर त्याचबरोबर रुग्णांना बार्शीचे कॅन्सर हॉस्पिटल जाण्याची सुविधा होईल. तसेच धनबाद - कोल्हापूर - धनबाद या साप्ताहिक गाडीला हिमायतनगर येथे एक मिनीटाचा थांबा द्यावा या गाडीने वारणशी, बौद्धगया, जैन समाजाचे क्षेत्र असलेले शिखरजी क्षेत्र व कोल्हापूरची महालक्ष्मी देवी दर्शन, शिर्डीसह अनेक भाविकांना याच लाभ होईल. तासेच हिमायतनगर व परिसरातील प्रवाशांना नांदेडला जाण्यासाठी सकाळी ९ नंतर दुपारी ३ वाजताच रेल्वे असल्याने मध्यंतरी एक रेल्वे आदिलाबाद ते नांदेड नियमित सोडावी अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच आगामी काळात नांदेड - शिर्डी रेल्वे सुरू होणार आहे, हि गाडी आदिलाबादहुन सोडावी त्याले प्रवाश्याना सुपाच्य वेळी पुढे मार्गक्रमण करण्यास सोईचे होईल असेही रेल्वे संघर्ष समिती, भाविक भक्त व प्रवाश्यांची नांदेड रेल्वे डिव्हिजन कार्यालय, हिंगोली मतदारसंघाचे खा. राजीव सातव, रेल्वे समितीचे सदस्य दै प्रजावाणी संपादक शंतनू डोईफोडे यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे. 


    Tags