BREAKING NEWS

logo

हिमायतनगर, सतत तीन चार वर्षापासून दुष्काळाच्या झळ सोसणारा बळीराजा यंदा जोमाने कमला लागला, पेरणी केली, मात्र महिन्याभरा पासून वरून राजाने वक्र दृष्टी केल्यामुळे दुबार आणि तिबार पेरणीचे संकट ओढावाले आहे. उन्हाचा कडक वाढत असल्याने ग्रामीण भागातील शेतकरी पिके वाचविण्याकरिता हंडे, बकीट, कळशीने पाणी आणून पिकाना जगविण्यासाठी धडपडत असल्याचे चित्र नांदेड जिल्ह्यात दिसून येत आहे.

मृग नक्षत्राच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यानि आनंदाने पेरण्या उरकल्या. अनेक शेतकऱ्यांनी यंदा कापसाला बगल देऊन सोयाबीनची पेरणी जास्त केली, त्याचबरोबर कापूस, तूर, , मुग, उडीद, हळद इत्यादि बियाने पेरली. चांगल्या पसामुळे जमिनीतील पिके निघाली, मात्र यंदाच्या बियाण्यामध्ये सुद्धा खोत असल्याने अनेकांना दुबार पेरणी करावी लागली. त्यानंतर महिन्यापासून पावसाने दडी मारल्यामळे शेतकरी पूर्णतः हवालदिल झाला आहे. आभाळात दाटून येणारी धागे क्षणात गायब होत असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा लागली आहे. पाऊस पाडण्यासाठी वरून राजाला साकडे घातले जात असले तरी अनेक शेतकरी, स्प्रिंकलर, घोड्याने पाणी टाकून पिके जगविण्यासाठी धडपडत आहेत. अशीच परिस्थिती राहिली तर बहुतांश शेतकऱ्यांना तिबार पेरणीची वेळ येणार असल्याचे शेतकरी बोलून दाखवीत आहेत.  
 

    Tags