BREAKING NEWS

logo

हिमायतनगर, महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली, मात्र यामध्ये अनेक शेतकर्याना लाभ मिळत नसल्याने कर्जमाफीतुन अनेक शेतकरी वंचित राहात आहेत. याची जाणीव शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना होताच त्यांनी दिलेल्या आदेशानुसार दि.१० जुलै रोजी जिल्हा बैकेसमोर ढोल वाजवून समबंधितांना निवेदन देण्यात आले आहे.

हिमायतनगर येथे सकाळी ११ वाजता जिल्हा बॅकेसमोर ढोल वाजून शिवसैनिकांनी अनोखे आंदोलन करण्यात आले. आणि संबंधित बॅंकेच्या अधिकार्‍यांना एक निवेदन देण्यात आले असून, या निवेदनात पात्र लाभार्थीची यादी दर्शनी भागात लावावी अशी मागणीही करण्यात आली आहे. यावेळी तालूका प्रमुख रामभाऊ ठाकरे, युवासेना तालूका प्रमुख विशाल राठोड, उपशहर प्रमुख कल्याणसिंह ठाकूर, उपतालूका प्रमुख राजीव जाधव, संघटक कृष्णा वानखेडे, सत्यवृत ढोले, साईनाथ धोबे, रामराव पाटील, मदनराव पाटील, प्रकाश जाधव, वसंत ढवरे, सन्नटी कप्पलवाड, भाऊराव वानखेडे, राम नरवाडे, राजू पाटील, श्रीराम माने, अमोल पाटील, प्रमोद शिरले, संजय काईतवाड, राजू पाटील पिंपरी, लखन जैस्वाल, प्रकाश रामदिनवार, अमोल धुमाळे, सुधाकर जिट्टेवाड, आदींसह कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. 

    Tags