logo

हिमायतनगर, सध्या स्वच्छ महाराष्ट्र अंतर्गत जिल्हा पातळीवर गांवे व शहरे हागणदरी मुक्त करण्यासाठी युध्द पातळीवर प्रयत्न चालू आहेत. परंतु या अभियानाला हिमायतनगर नगरपंचायतीमध्ये खीळ बसत असल्याचे चित्र दिसून येत आहे. येथील नागरिकांनी निवडून देिलेल्या लोकप्रतिनिधी कडून योजनेला गती देण्याऐवजी शासनाचा निधी कसा लाटता येईल याकडे विशेष लक्ष दिले जात असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. त्यामुळे स्वच्छ अभियान योजनेची वाट लागत  असल्याचे चित्र दिसून येत आहे.

याबाबत सविस्तर असे कि, हिमायतनगर शहरातील वॉर्ड क्रमांक १३ मधील शहरातील नागरिक सौ. आशा बालाजी पतंगे याना नगरपंचायत ने दि ४ जुलै २०१७ रोजी नोटीस देऊन आपण स्वच्छ महाराष्ट्र अंतर्गत रक्कम घेऊन शौचालयाचे बांधकाम पुर्ण न केल्याबाबत नोटीस बजावली आहे. येत्या सात दिवसाच्या आत शौचालयाचे बांधकाम पुर्ण न केल्यास आपणावर फौजदारी स्वरुपाची कार्यवाही करण्याय येईल अशी तंबीही या नोटीसच्या माध्यमातून देण्यात आली आहे. अशी नोटीस मिळताच संबधित महिलेला धक्काच बसला, कारण या महिलेने शौचालय बांधकाम करण्यासाठी नगरपंचायतला अर्ज केला होता. त्यानंतर संबंधित कुटूंब प्रमुखाचे आधार कार्डसह खाते क्रमांक सुध्दा देण्यात आले. परंतू या महिलेच्या नांवावर शौचालयाची रक्कम जमा झालीच नाही. त्यामुळे आपण ताबडतोब बांधकाम पुर्ण करून सहकार्य करावे अशी नोटीस दिल्याने संबंधित महिलेने नगरपंचायत गाठून शौचालयाची रक्कम माझ्या खात्यावर जमा झाली नाही. शौचालयाची रक्कम परस्पर हडप केली गेली..? अशी शंका येत  आहे. रक्कमच मिळाली नाही तर शौचालयाची बांधकाम करण्याची नोटीस कशी काय...? दिली. असा प्रश्न उपस्थित केल्याने संबंधितांची झोप उडाली आहे. या बाबीची सारवा - साराव करण्यासाठी नगर पंचायतीच्या पुढाऱ्यासह संबंधितांकडून प्रयत्न केले जात आहेत. माझ्या सारखे अनेक शौचालयाचे लाभार्थी अजूनही अनुदानाच्या निधीपासून वंचित असून, अनेक जणांनी तर जुने शौचालय दाखवून शासनाचा निधी उचलला असल्याचे तक्रारकर्त्यांचे म्हणणे आहे. या सर्व प्रकारची चौकशी करून शासनाची दिशाभूल करून निधीवर डल्ला मारणाऱ्या संबंधितांवर गुन्हे दाखल करावे आणि न्याय मिळवून द्यावं अशी मागणी निवेदनाद्वारे अशा पतंगे यांनी केली आहे. अन्यथा स्वःचा भारत अभियानात होत असलेल्या भ्रष्टाचाराची पोलखोलण्यासाठी लोकशाही मार्गाने आमरण उपोषण कारवाई लागेल असा इशाराही दिला आहे. या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या इमेलवर पाठविण्यात आल्याचेही याणी सांगितले. 

स्वच्छ भारत निधीच्या गैरप्रकार चौकशीकडे लक्ष 
एकूणच शौच्चालय बांधकामाच्या निधीत अफरातफर होत असल्याच्या प्रकारामुळे हिमायतनगर नागरपंचायतींमार्फत चालविल्या जात असलेल्या स्वच्छ भारत अभियानात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार केल्या जात असल्याचे उघड होऊ लागले आहे. याकडे संबंधित विभाग लक्ष देईल कि, प्रकरण रफादफा  केले जाईल..? याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

    Tags