logo

हिमायतनगर, येथील पत्रकार दत्ता शिरणे याना कै. डॉ. शंकरराव चव्हाण कार्यरत्न पुरस्कार जाहीर झाला असून, दि १४ रोजी सदरचा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.   

हिमायतनगर येथील पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे दै. प्रजिवाणीचे हिमायतनगर तालूका प्रतिनिधी दत्ता शिराणे यांनी पत्रकारीतेच्या माध्यमातून शेतकरी, कष्टकरी, सर्व सामान्य जनतेच्या समस्या मांडल्या यातून बर्याच प्रमाणात तालूक्याच्या विकासाचे प्रश्न मार्गी लागले आहेत. यांचे पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य पाहता देशाचे माजी गृहमंत्री तथा मराठवाड्याचे भाग्यविधाते कै. डॉ. शंकरराव चव्हाण कार्यरत्न पुरस्कार देऊन दि. १४ जुलै रोजी गौरविण्यात येणार आहे. या पुरस्काराचे वितरण माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण, आ. अमिताताई चव्हाण यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. शिराणे यांच्या निवडीचे मा. आ. माधवराव पाटील जवळगावकर, मा. जि. प. सदस्य सुभाष राठोड, मा. सभापती परमेश्वर गोपतवाड, नगराध्यक्ष अ. अखिल अ.हमीद, मा संचालक रफीकभाई, डॉ. राजेंद्र वानखेडे, डॉ. प्रकाश वानखेडे, पत्रकार प्रकाश जैन, अनिल मादसवार, साईनाथ धोबे, कांनबा पोपलवार, पांडुरंग गाडगे, आदींसह अनेकांनी अभिनंदन केले आहे. 

    Tags