logo

हिमायतनगर, आषाढी एकादशी तथा पंढरपुर यात्रा उत्सवानीमीत्त वाढोणा नगरीत आयोजीत अखंड विना सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाची सांगता पालखी मिरवणुकीने करण्यात आली आहे. 

सप्ताहापासून येथील श्री परमेश्वर मंदिरातील विठ्ठल - रुख्मिणीच्या मूर्तीचे अभिषेक व पूजन करून ग्रंथराज ज्ञानेश्वरी परायणाची सुरुवात करण्यात आली होती. याचा समारोप निमित्ताने शहरातील मुख्य रस्त्यावरून टाळ - मृदंग व बॅडबाज्याच्या गजरात ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या पालखी मिरवणुक काढण्यात आली. या दिंडीत ज्ञानेश्वरी पारायणास बसलेल्या वारकरी सांप्रदायीक भकत, महीला मंडळींनी डोकयावर ग्रंथ घेऊन सहभागी झाल्या होत्या. दिंडीत सहभागी झालेल्या श्री परमेश्वर भजनी मंडळाच्या महीला- पुरुष मंडळीच्या भकतीगीताने शहरात मंगलमय वातावरण निर्माण झाले होते. सदरची दिंडी शहरातील मुख्य रस्त्यावरून परत परमेश्वर मंदिरात आल्यानंतर समारोप भकती गीत भजनाने करण्यात आला. यावेळी उपस्थीत भकतांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून आषाढी एकादशी दिनी नगरप्रदक्षिणा काढण्याची परंपरा मंदिर समितीच्या पुढाकारातून अविरतपणे सुरु आहे.

    Tags