logo

हिमायतनगर, येथील पंचायत समिती कार्यालयात दि.१२ जुलै रोजी आयोजित वसंतराव नाईक सभागृहात जनता दरबार घेऊन विविध विकास कामाचा आढावा घेण्यात आला. यावेळी उपस्थितांनी समस्यांचा भडीमार केला असून, या समस्या लवकरात लवकर सोडविण्याचे आश्वासन माजी आ.माधवराव पाटील जवलगांवकर, नांदेड़ जिला परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती शांताबाई पवार यानी दिले.

बुधवारी सकाळी ११ वाजता उपस्थित जनतेच्या विविध विकास विषयक कामांचा व आडीअडचनींचा आढावा आयोजित जनता दरबारात घेण्यात आला. यावेळी  सदरील बैठकीत शैक्षणिक, बैंकिंग, निराधार व महावितरणच्या हलगर्जीपणाचा प्रश्न, प्रामुख्याने ऐरणीवर आला होता. तसेच शासनाच्या वतीने ग्रामीण भागातील गोर - गरिबांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, विकास विषयक अनेक प्रश्न मांडण्यात आले. यावेळी ग्रामसेवक संबंधित गावात उपस्थित राहत नाहीत, अनेक कर्मचारी रेल्वेने अपडाऊन करतात, मानव विकासाच्या बसेसची कमतरता असल्याने विशेषतः मुलींना जगाचा मिळत नाही. अर्धवट पाणी पुरवत योजनेमुळे पाणी टंचाईचा समान भर पावसाळ्यातही करावा लागतो, आरोग्याच्या समस्येकडे संबंधितांकडून दुर्लक्ष होत असल्याने डासांची उत्पत्ती वाढून साथीचे आजार पसरण्याची भीती असल्याचे सांगून तातडीने यावर उपायोजना व्हावयात, तसेच चिंचोडि आरोग्य केंद्राची अवस्था असौन अडचण नसून खोळंबा अशी झाली आहे. वेळेवर उपचार मिळत नाही, तसेच सवच्छ भारत अभियानात शौचालयाच्या निधीची अफरातफर, अनेक तलाठी शेतकऱ्यांना फारफार साठी अडवणूक करतात, यासह अनेक वर्षांपासून ताब्यात असलेली गावठाण जागा नावावर करण्याची मागणी करण्यात आली. सर्व समस्या ऐकून आगामी काळात समस्या सोडवण्याचे आश्वासन जिला परिषद अध्यक्ष जवळगावकर, पंचायत समिती सभापती सौ.माया राठोड, उपसभापती खोब्राजी वाळके, यांनी उपस्थितांना दिले. यावेळी बोलताना जवळगावकर म्हणले कि, माझ्याकडे संपूर्ण जिल्ह्याची जबाबदारी आहे. असे असताना भेटी देण्यास थोडा विलंब झाला तरी कोणीही नाराज होऊ नये, आपले जे काही कामे आहेत ती तातडीने पूर्ण केले जातील. तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या येणाऱ्या समस्या, अडचणी तातडीने सोडवाव्यात. काही अडचण आल्यास नागरिकांनी थेट माझ्याशी संपर्क साधावा असेही ते म्हणाले. यावेळी हिमायतनगरचे नगराध्यक्ष अ. अखिल, अ.हमीद, प.स.सदस्या, सौ.सुरेखा आडे, सौ.कोठेकर, प्रभारी तहसीलदार वागवाड, गटविकास अधिकारी सुहास कोरेगाव, गटशिक्षण अधिकारी रमेश संगपवाड, महावितरण विभागाचे उपकार्यकारी अभियंता अरविंद काटकर, सहाय्यक अभियंता पंडित राठोड, पशुधनविकास अधिकारी धनंजय मांदळे, वैद्यकीय अधिकारी दामोधर राठोड, बैंकिंग क्षेत्रातील अधिकारी यासह संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी, माजी जी.प.सदस्य सुभाष राठोड, अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष फेरोज खान, नाजीमचे संचालक गणेश शिंदे, जोगेंद्र नरवाडे, चांदभाई, यांच्यासह सरपंच, नागरिक, पत्रकार उपस्थित होते.                                                                                                           

    Tags