logo

हिमायतनगर (एनएनएल) शहरातील परमेश्वर गल्लीतील डीपीवरील खांबावर लाईटचे काम करण्यासाठी गेलेल्या एका ऑपरेटरला अचानक वीज सुरु झाल्याने जबरदस्त शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली  आहे. गजानन किशन हेंद्रे असे मयत युवकाचे नाव असून, विजेचा जबरदस्त शॉक लागल्यामुळे काल तो गंभीर जखमी झाला होता. 

रविवार दि.16 जुलैच्या सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास कंत्राटी आॅपरेटर गजानन हेंद्रे हा शहरातील राजा भगीरथ विद्यालयाच्या ग्राऊंडमध्ये असलेल्या विदुत पोलवर लाईटचे काम करण्यासाठी चढला होता. अचानक त्यास खांबावर शाॅट लागल्याने विस मिनीट खांबावर अडकून पडला. घटनेची माहिती मिळतच परमेश्वर डेपोवरील फ्युज काढून तातडीने खाली आणून हिमायतनगर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचार करून प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी नांदेडच्या शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथे त्याचावर उपचार सुरु असताना मृत्यू झाला. अकाली घडलेल्या या दुख:द घटनेमुळे हिमायतनगर शहरावर शोककळा पसरली असून, त्यांच्या पार्थिवावर दि.१७ जुलै रोजी दुपारी ०१ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत गजानन हेंद्रे हा पळसपूर येथील स्टेशनवर आॅपरेटर म्हणून काम पहात असे. त्याच्या मृत्यू पश्चात आई वडील, एक भाऊ, दोन बहिणी असा परिवार असून, त्याच्या अकाली निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत होती. या दुर्दैवी घटनेतून  सावरण्यासाठी महावितरण कंपनीने कुटुंबीयांस मदत करावी अशी मागणी केली जात आहे. 
    Tags